शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र राज्याच्या मुंबईतील विधीमंडळामधील मध्यवर्ती सभागृहात लावण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या तैलचित्राचे सोमवार, २३ जानेवारी रोजी अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला ठाकरे घराण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. याव्यक्तिरिक्त ठाकरे कुटुंबातून निहार ठाकरे, स्मिता ठाकरे हेही उपस्थित होते.
ठाकरे गटातील कोण होते उपस्थित?
हे तैलचित्र शकुंतला कदम यांनी रेखाटले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहिले, तर विधान परिषदेचे उपसभापती म्हणून डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित न राहता उद्धव ठाकरे षण्मुखानंद येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी विधान भवनाचे अधिकारी मातोश्री येथे गेले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नव्हती, तेव्हाच उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असे संकेत मिळाले होते.
(हेही वाचामुंबईतील ठाकरेंचे अस्तित्व संपले! जिथे युती करणारे पक्ष मातोश्रीवर पायधूळ झाडत होते, तिथे उद्धव ठाकरे…. )
Join Our WhatsApp Community