बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण : ‘मातोश्री’वर निमंत्रण पत्रिका देण्यासाठी विधीमंडळ सचिवांना करावी लागली कसरत

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवनात बसवण्यात येत असून बाळासाहेबांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे. या अनावरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण बाळासाहेबांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात न आल्याची चर्चा  होत आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वारंवार संपर्क साधूनही संपर्क न होणाऱ्या उध्दव ठाकरेंशी अखेर नार्वेकर यांनी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यानंतर विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना ‘मातोश्री’वर ठाकरे कुटुंबाने भेट दिली नाही, त्यामुळे अखेर भागवत यांना टेलिफोन ऑपरेटरकडे निमंत्रण पत्रिका ठेवून निघावे लागले अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे कार्यक्रमाला उध्दव ठाकरे व त्यांचे कुटुंब उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.

राजेंद्र भावगत यांना ‘मातोश्री’ तून भेटीची वेळ देण्यात आली नव्हती

येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी विधान भवनात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थितीत होत आहे. परंतु याचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री व बाळासाहेबांचे पुत्र व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात आले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर उद्धव ठाकरे यांच्याशी राहुल नार्वेकर यांचा गुरुवारी दूरध्वनीवरुन  संवाद झाला. या संवादानंतर  विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत  गुरुवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन पोहोचले. पण राजेंद्र भावगत यांना ‘मातोश्री’ तून भेटीची वेळ देण्यात आली नव्हती. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राजेंद्र भागवत यांना तारेवरची कसरत करावी लागल्याची माहिती मिळत आहे. ‘मातोश्री’त भागवत यांना ठाकरे कुटूंबातील कुणीही भेटले नाही. त्यामुळे राजेंद्र भागवत यांनी ‘मातोश्री’तील दूरध्वनी ऑपरेटरकडे आमंत्रणाची पत्रिका दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आता  कमीच असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here