बाळासाहेबांचा दुर्मिळ फोटो पाहण्यासाठी राऊतांनी दिले राज ठाकरेंना आमंत्रण

95

बाळासाहेबांचे ठाकरेंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मुंबईतील जहांगीर दीक्षांत सभागृह फोर्ट कॅम्पसमध्ये प्रदर्शन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या या दुर्मिळ छायाचित्रांना पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर शुक्रवारी संजय राऊत यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावर प्रतिक्रिया देताना, संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने मी भावूक होतो. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले, असे म्हणताना त्यांनी राज ठाकरेंना हे प्रदर्शन पाहण्याचे निमंत्रणही दिले.

दिल्लीतून चालणा-या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई ठरवला

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री हे सर्वांना पडलेले कोडे असायचे. एकमेकांवर राजकीय टीका करायचे मात्र मैत्री कायम होती. त्यामुळे राज ठाकरे यांना मी निमंत्रण देतो त्यांनी हे छायाप्रदर्शन पाहायला यावे. बाळासाहेब यांनी राजकारण बदलले. दिल्लीतून चालणा-या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई ठरवला, असेही त्यांनी त्यावेळी आवर्जून सांगितले.

(हेही वाचा: अभ्यास करता येत नसेल, तर भाजपची कॉपी करा; पण ओबीसी आरक्षण पास करा)

संभाजीराजेंविषयी काय म्हणाले राऊत

राज्यसभा निवडणुकीबाबत खासदार संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यावर बोलताना, राऊत म्हणाले की, संभाजीराजे यांचा आदर आहे. मात्र शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही. ते निवडणुकीत उतरले. आमच्याकडेही अधिक मते नाहीत त्याची जुळवाजुळव करावी लागते. खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी राऊतांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.