नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यापासून काँग्रेसमध्ये तांबे-थोरात विरुद्ध पटोले असा वाद रंगला आहे. सत्यजीत तांबे यांचा या निवडणुकीत विजय झाल्यानंतर काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले. थोरातांच्या या राजीनाम्यानंतर आता नाशिकमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. माहितीनुसार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून जिल्हाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबेंसह त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसने दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला आहे. यामध्ये नाशिकच्या पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची समावेश आहे.
(हेही वाचा – संभाजीराजे यांची मोठी घोषणा; नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार!)
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआयचे अध्यक्ष ललित मानभाव, सहकार सेलचे अध्यक्ष कुमार भोंडवे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा भोये, महिला शहराध्यक्ष रुख्मिणी गाडर, गीता जाधव, विकास सातपुते, राहुल बिरारी, दिनेश भोये, कैलास गाडर यांनी सामूहिक राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे पाठविले आहे. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही या पत्राची प्रत सादर करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community