अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना पिताश्रींचे तैलचित्र लावू शकले नाही; भाजपचा ठाकरेंना टोला

123

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेल्या तैलचित्रावरुन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना स्वत:च्या पिताश्रींचे तैलचित्र लावू शकला नाहीत, असे म्हणत तुम्ही टीका करत राहा आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असा टोला दरेकर यांनी उद्वव ठाकरे यांना लगावला आहे.

प्रवीण दरेकर टीका करताना म्हणाले की, मला वाटते अजूनही सुधारायचे काही लक्षण दिसत नाही. गद्दार- गद्दार, खोके-खोके यांच्या पलीकडे ठाकरेंना काही दिसत नाही. शिंदे साहेब याच्या कौसो मैल दूर निघून गेले आहेत. तु्म्ही अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. पंचवीस वर्षांत मुंबईची वाट लावली आहे. त्यामुळे आता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्या टीका टिप्पणीवर आम्ही लक्ष देत नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

( हेही वाचा: भाजपाच्या खेळीपुढे महाविकास आघाडी निष्प्रभ )

हिंदुत्वाचा विचार काॅंग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय

उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांना आपल्याचा पिताश्रींचे तैलचित्र लावता आले नाही. मी बोरवलीतून हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैदानाचे उद्धाटन करुन आलो आहे. ते तुम्हाला का जमले नाही, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तुम्ही हिंदुत्वाचा विचार काॅंग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला आहे, असेही टीकास्त्र दरेकर यांनी ठाकरेंवर डागले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.