मंगळवार, ११ मार्चपासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. कालपर्यंत भारतावर दहशतवादी पाठवून त्यांच्या माध्यमातून हल्ले करणाऱ्या पाकिस्तनाला याच प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जावे लागते तेव्हा पाकिस्तानची तारांबळ उडाली आहे. बलुच आर्मीने (Balochistan Liberation Army) जाफर ट्रेन हायजॅक केल्यावर पाकिस्तानी सरकारला स्पष्टपणे ठणकावून सांगितलेले कि, जर लष्करी करावाई केली तर ट्रेनमधील ओलीस ठेवलेले २०० जवान, पोलीस आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांना ठार करू. तरीही पाकिस्तानने लष्करी कारवाई केली. त्यामुळे बलुच आर्मीने (Balochistan Liberation Army) १०० हुन अधिक पाकिस्तानी सैन्यांना ठार केले. असा दावा बलुच आर्मीने केला आहे. पाकिस्तानी सरकारनेही घटनास्थळी २०० हुन अधिक रिकाम्या शवपेट्या पाठवल्या आहेत.
Pakistan Army has arranged over 100 empty coffins (caskets) at the Quetta Railway station in Balochistan 27hrs after the Jaffar Express train hijack. 50 Pakistani soldiers were killed by Baloch fighters. Pakistan Army has been hiding death roll of Pakistani soldiers from public. pic.twitter.com/2DQESvz4cx
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 12, 2025
(हेही वाचा नेपाळला Hindu Rashtra घोषित करण्यासाठी हजारो नागरिक उतरले रस्त्यावर; राजे ज्ञानेंद्र शाह यांचे पुनरागमन)
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिक आणि बलुच लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) आर्मीमध्ये गेल्या ३६ तासांपासून लढाई सुरू आहे. मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्यानंतर, बीएलएने ६० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बीएलएचा दावा आहे की, त्यांच्या ताब्यात अजूनही १५० ओलिस आहेत. जर पाकिस्तान सरकारने पुढील २० तासांत बलुच कैद्यांना सोडले नाही तर या सर्व लोकांनाही मारले जाईल. बुधवारी दुपारी, पाकिस्तान सरकारने २०० शवपेट्या बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे पाठवल्या आणि असा दावा केला की त्या प्रोटोकॉलनुसार पाठवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी सरकारी माध्यमांचे म्हणणे आहे की सर्व बलुच लढवय्ये (Balochistan Liberation Army) मारले गेले आहेत आणि काही ओलिसांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community