Amaravati LS Constituency : अमरावतीत चार वानखेडे निवडणूक मैदानात

आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे.

157
Amaravati LS Constituency : अमरावतीत चार वानखेडे निवडणूक मैदानात
  • सुजित महामुलकर

अमरावती लोकसभा मतदार संघात (Amaravati LS Constituency) महायुतीच्या नवनीत राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे हे एकच वानखेडे निवडणूक मैदानात नाहीत तर अजून तीन वानखेडे आहेत. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे भाऊराव वानखेडे आणि दोन अपक्ष उमेदवार रवी वानखेडे आणि तारा वानखेडे हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. (Amaravati LS Constituency)

एकूण ३७ उमेदवार

महायुतीच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बहुजन समाज पक्षाचे (बसपा) संजायकुमार गाडगे, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनाशक्ती पार्टीचे दिनेश बूब असे एकूण ३७ उमेदवार या मतदार संघात आपले नशीब आजमावणार आहेत. आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. बसप, प्रहार, रिपब्लिकन सेना यांच्या तसेच चार वानखेडे यांच्यातील मतविभागणीचा फायदा भाजपाच्या राणा यांना नक्कीच होऊ शकतो. (Amaravati LS Constituency)

(हेही वाचा – Election : अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकता आणि मतदानही करू शकता; काय म्हटले निवडणूक आयोगाने?)

मतदान २६ एप्रिलला

अमरावती मतदार संघात ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यापैकी ४६ स्वीकारले गेले तर ५ फेटाळले गेले. २२ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आणि शिल्लक ३७ निवडणूक रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिलला मतदान होणार असून येत्या बुधवारी २४ एप्रिलला प्रचार थांबवला जाईल. (Amaravati LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.