भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ आणि २०५- चिंचवड येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक १६ फेब्रुवारीच्या सकाळी सात वाजेपासून ते दिनांक २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१च्या कलम १२६ (1) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचा – भाजपमुळे तांबेंचा विजय, आता त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घ्यावा – राधाकृष्ण विखे-पाटील)
Join Our WhatsApp Community