हिंदू फोरम कॅनडाने कॅनडात राहणारा खलिस्तानी (Khalistani) दहशतवादी आणि प्रतिबंधित शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू याच्यावर कॅनडात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी केली आहे. फोरमचे वकील पीटर थॉर्निंग यांनी कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांच्याकडे पन्नूच्या प्रवेशावर बंदी घालण्याची विनंती केली आहे.
थॉर्निंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पन्नूच्या धमक्यांमुळे केवळ हिंदूंमध्येच नाही, तर कॅनेडियन समुदायातील अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यानंतर त्यांनी पन्नूवर हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवल्याबद्दल कारवाई आणि त्याच्या कॅनडामध्ये येण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. थॉर्निंगने आपल्या पत्रात पुढे लिहिले की, कॅनडाने कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचे प्रयत्न स्वीकारू नयेत आणि कठोर कारवाई करावी. हिंदू फोरमने पत्रात पन्नूच्या व्हिडिओचा केवळ वडिलधाऱ्यांवरच नाही तर शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलांवरही कसा नकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले आहे.
व्हिडिओ बनवताना पन्नू कॅनडात होता
थॉर्निंग यांनी म्हटले आहे की, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कॅनडाने अशा भाषणांकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे. व्हिडीओ बनवण्याच्या वेळी पन्नू कॅनडामध्ये असेल तर त्याची चौकशी करून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असेही मंचाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community