गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप 

बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्यामुळे राज्यात कालपर्यंत ८७ लाख बैल होते, त्यांची मागील दीड - दोन वर्षांत ५७ लाख इतकी संख्या झाली आहे. ३० लाख बैल कत्तलखान्यांकडे गेले, अशी धक्कादायक माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

192

बैलगाडी शर्यत ही ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालन पोषण करतो, त्यांना सकस आहार देतो, त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खऱ्या अर्थाने गोवंश वाढतो. मात्र या बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्यामुळे राज्यात कालपर्यंत ८७ लाख बैल होते, त्यांची मागील दीड – दोन वर्षांत ५७ लाख इतकी संख्या झाली आहे. ३० लाख बैल कत्तलखान्यांकडे गेले. जर असेच हे चालू राहिले, तर १-२ वर्षांत बैल चित्रात बघावा लागेल. गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली जात आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ‘ऑफ बीट पडळकर’ या ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गोपीचंद पडळकर बोलत होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी ही मुलाखत घेतली.

New Project 3 8

सर्वोच्च न्यायालयात सरकार योग्य बाजू मांडत नाही!

बैलगाडा शर्यत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकार योग्य बाजू मांडत नाही. या विषयावर ३-३ वर्षे तारखा पडत नाहीत. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. बैलगाडा शर्यत हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या घरी गाई, बैल हा गोवंश आहे. म्हणून आता आम्ही या विषयात उतरलो आहे. शेतकरी बैलांना मुलाप्रमाणे जपतो, त्यांना सकस आहार देऊन वाढवतो. ही बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने ग्रामीण संस्कृती आहे. ही शर्यत ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे आम्ही या विषयावर राज्य सरकारच्या विरोधात उतरलो आहोत. सरकारने त्वरित यात लक्ष घालावे. तामिळनाडूमध्ये बैलांच्या शर्यतींना परवानगी आहे. कर्नाटकातही याला परवानगी आहे. कारण त्याविषयावर त्या राज्यांनी कायदा बनवला आणि टिकवला आहे. म्हणून २० ऑगस्ट रोजी माझ्या गावात आंदोलन होणार आहे, त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी बैल घेऊन यावे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.

(हेही वाचा : आझाद मैदान दंगल : धर्मांध मुसलमान आरोपी मोकाट, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत!)

गोवंश संपवण्याचा ट्रॅक्टर लॉबीचा प्रयत्न! 

राज्यात बैलांची संख्या ८७ लाख होती, आता ५७ लाख झाली आहे. ३० लाख बैल गेले कुठे? ते कत्तलखान्यात गेले. हे जर असेच सुरु राहिले तर पुढच्या १-२ वर्षांत बैल चित्रात पाहावा लागेल. सर्वोच्च न्यायालयात सरकारने योग्य बाजू मांडली पाहिजे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. यापूर्वी १-दीड लाखांत बैलाला किंमत होती, आता त्यांना ३० जाहीरही मिळत नाही. बैल संपवावे, अशी काहींची धारणा आहे. कारण त्यांना ट्रॅक्टर विकायचे आहेत. यामागे ट्रॅक्टर लॉबी विशेष कार्यरत आहे. गोवंशच संपला, तर दूध ट्रॅक्टरचे प्यायचे का? आपली मुले सुदृढ झाली पाहिजे, त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे, यासाठी गोवंश जगाला पाहिजे, म्हणून आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे, असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.