भारत सरकारने गुरुवारी (३ ऑगस्ट) इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे की, लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातींवर तात्काळ निर्बंध घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकार ‘मेक इन इंडिया’वर भर देत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पोस्ट अथवा कुरिअरच्या माध्यमातून ई-कॉमर्स पोर्टलहून खरेदी केलेल्या संगणकासह ऑल इन वन पर्सनल संगणक किंवा अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर संगणकाच्या आयातींसाठी इम्पोर्ट लायसन्सिंगमधून सूट दिली जाईल. स्थानिक उत्पादक आणि अशा परदेशी कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : विरोधकांपासून सावध रहा; गरिबांची कामे करा, पंतप्रधानांचा मित्र पक्षांना सल्ला)
मे महिन्यात आलेला अहवाल
मे महिन्यात आलेल्या जीटीआरआयच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, चीनमधून लॅपटॉप, वैयक्तिक संगणक, इंटिग्रेटेड सर्किट्स आणि सोलरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात गेल्या आर्थिक वर्षात कमी झाली आहे.
ट्रेड डेफिसिट होणार कमी
लॅपटॉप, वैयक्तिक संगणक, मोबाईल फोन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून येईल. योग्य वस्तू देशातच बनवल्या गेल्या आणि लोकल सप्लाय चेनसह ग्लोबल सप्लाय चेनसह सहकार्य वाढलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community