मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना ग्रामसभेचा विरोध; गटविकास अधिकाऱ्याने निर्णयाला स्थगिती देताच Nitesh Rane यांनी सुनावले खडेबोल

83
मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना ग्रामसभेचा विरोध; गटविकास अधिकाऱ्याने निर्णयाला स्थगिती देताच Nitesh Rane यांनी सुनावले खडेबोल
मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना ग्रामसभेचा विरोध; गटविकास अधिकाऱ्याने निर्णयाला स्थगिती देताच Nitesh Rane यांनी सुनावले खडेबोल

भाजपा (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्याची भेट घेऊन ग्रामसभेच्या निर्णयावर आक्षेप कसा काय घेता, असा सवाल केला आहे. दि. २१ फेब्रुवारीला मढी येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र या प्रस्तावाविरोधात मुस्लिम व्यापारी जेव्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी हा ठराव घटनेला धरून नाही असं सांगत त्या निर्णयाला स्थगिती दिली. ज्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) गटविकास अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

( हेही वाचा : नाशिक येथील कुंभमेळ्याबाबत Mahant Aniketshastri Maharaj यांच्या सरकारला महत्त्वाच्या सूचना

ग्रामसभेत नेमका काय ठराव झाला?

सरपंचांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावाबद्दल सांगितले की, मढीच्या यात्रेतले (Madhi Yatra) बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. यावेळी गावकरी श्रद्धेने अनेक रितीरिवाज पाळतात. मात्र मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावतात. याच कारणामुळे आम्ही मुस्लिम (Muslim) व्यापाऱ्यांना या यात्रेत बंदी घालण्याचा ठराव केला आहे, असे सरपंच म्हणाले.

दरम्यान मढी ग्रामपंचायतीने (Madhi Gram Panchayat) केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसत असून याबाबत गटविकास अधिकार्‍यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे (Sangita Palve) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार सत्तेत आहे हे गटविकास अधिकाऱ्यांना ठाऊक नाही का? जर ग्रामसभा घेऊन एखादा निर्णय मढी गावातल्या गावकऱ्यांनी घेतला आहे तर त्या निर्णयाला गटविकास अधिकारी स्थगिती कशी काय देऊ शकतात? माझं गावकऱ्यांना सांगणं आहे की त्यांनी एक ठराव तयार करुन त्यावर सगळ्या ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या पाहिजेत. तसं झाल्यास मी बघतोच की गटविकास अधिकारी हा ठराव कसा नाकारतात?” त्यातच राणेंनी दौऱ्याच्या दरम्यान गटविकास अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.