केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घातली, त्यावर बोलताना भाजपा नेते आमदार नितेश राणे म्हणाले की, एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला, आता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे, असे म्हटले.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असे केंद्राने म्हटले आहे. पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आहेत.
(हेही वाचा PFI नंतर आता SDPI वर देखील सरकार घालणार बंदी?)
काय म्हटले नितेश राणे यांनी ट्विटमध्ये?
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना सलाम. पीएफआयवर बंदी घालणे ही काळाची गरज होती. आता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे. सर्वांना मिटवून टाका, हा आमचा हिंदुस्तान आहे, अशा आशयाचे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.
Ek hi maara.. magar solid maara na!!!
Salute to Hon Pm @narendramodi ji and Hon HM @AmitShah ji !!
Banning PFI was the need of the hour..now next is terrorist organisation Raza Academy which is working on the same lines..
Sabko saaf karo..
Ye Humara HINDUSTAN hai!!!— nitesh rane (@NiteshNRane) September 28, 2022
Join Our WhatsApp CommunityWhen SIMI was banned it started operations thru organisations like PFI..
Now we shud ensure that PFI shud not carry its operations thru organisations like Raza academy which work on the same lines..@PMOIndia @HMOIndia @NIA_India @Dev_Fadnavis— nitesh rane (@NiteshNRane) September 28, 2022