पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडवण्याचा कट असल्याचे समोर आले आहे.

( हेही वाचा: सामनातून जळजळ व्यक्त करणाऱ्यांनी ‘धौती योग’ घ्यावा; आशिष शेलार यांचा सल्ला )

समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाहीत

महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी पीएफआयवरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here