राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला; Chandrashekhar Bawankule यांची मागणी

47
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला; Chandrashekhar Bawankule यांची मागणी
  • प्रतिनिधी

काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारत विरोधी वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांना काही दिवस परदेशात जाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) नागपूर येथे. बोलताना केली. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असेही बावनकुळे यांनी जाहीर केले.

(हेही वाचा – Central Government: ‘चांद्रयान-४’ मोहिमेसाठी २ हजार १०४ कोटींची तरतूद! मंत्रिमंडळाची मंजुरी)

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसातील लेखाजोखा मांडला. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड किंवा खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही. परंतु, राहुल गांधी यांनी देखील सांभाळून बोलावे, असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनण्याआधी आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करतानाच बावनकुळे यांनी महाराष्ट्रात चुकून कॉंग्रेसचे सरकार आल्यास केंद्र सरकारच्या योजना बंद केल्या जातील, अशी भीती व्यक्त केली.

(हेही वाचा – Anant Chaturdashi : एकाच दिवशी ३६३ मेट्रिक कचरा, तर उत्सवात ५०० टन निर्माल्य झाले जमा)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहिरनाम्यातील बहुतांश आश्वासने १०० दिवसांत मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या कामांना जनतेसमोर घेऊन जात आहोत. महाराष्ट्राचा विकास डबल इंजिन सरकारच करेल हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, पंतप्रधान ग्रामसडक योजना, विमानतळे, मेट्रो, रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता, २०२४-२५ या वर्षासाठी शेतमालाच्या हमीभावात वाढ, शेतकऱ्यांसाठी १४ हजार २०० कोटींच्या सात मोठ्या योजनांना दिलेली मान्यता हे केंद्र सरकारचे हे काम लक्षणीय आहे, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.