“…मुख्यमंत्री महाविकास आघाडीत आल्यानं बिघडले”

145

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगतीत राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बिघडले आहेत, असा घाणाघात ह भ प बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ढवळ्या आणि पोवळ्याची उपमा देत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले बंडातात्या कराडकर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पूर्वी तसे नव्हते मात्र आता या महाविकास आघाडीत आल्यामुळे ते बिघडले. ढवळ्या शेजारी बांधला पोवळा या म्हणीचा वापर करत त्यांनी उध्दव ठकरे हे ‘ढवळ्या’ असून अजित पवार ‘पोवळा’ असल्याचं म्हटले आहे.

हा ढवळ्या म्हणजे अजित पवार

या पुढे असेही म्हणाले, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत. बाळासाहेब ठाकरे असा हिंदुत्वाचा पुरस्कार घेतलेला हिंदुह्रदयसम्राट अशी ज्यांची पदवी होती असा एक हिंदुत्वावादी पुढाऱ्यांचे उद्धव ठाकरे मुलगा आहेत. दारु आणावी, मंदिरं बंद करावीत सप्ताहं बंद करावेत, वाऱ्या बंद कराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे पुढारी नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार असून अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.

(हेही वाचा – वाझेवर तुरुंगात दबाव टाकला जात असल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप )

ठाकरे सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयामुळे विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात आंदोलनं देखील सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यातील बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.