Bandra East Constituency : ‘मातोश्री’च्या अंगणात सांगली पॅटर्न’?

132
Bandra East Constituency : ‘मातोश्री’च्या अंगणात सांगली पॅटर्न’?
  • खास प्रतिनिधी 

महाविकास आघाडीत वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातही ‘सांगली पॅटर्न’मुळे काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चांगलीच जुंपली असून आघाडीत बिघाडी होण्यास वांद्रे (पूर्व) मतदारसंघाने ठिणगी पडली. (Bandra East Constituency)

आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली नसताना शिवसेना उबाठाने लोकसभेच्या सांगली मतदारसंघाप्रमाणे वांद्रे (पूर्व)चा उमेदवारही घोषित करून वादाला तोंड फोडले. काँग्रेस आणि उबाठामध्ये आधीच विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून एकमत होत नसताना गेल्या आठवड्यात उबाठा नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्वमध्ये आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले. विशेष म्हणजे या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ बंगला असून ठाकरे कुटुंब याच मतदार संघात मतदान करतात. (Bandra East Constituency)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मालाडमधून शेलारांना उमेदवारी, अस्लमसाठी फुलटॉस की यॉर्कर ?)

काँग्रेसचा दावा

वास्तविक काँग्रेस आणि उबाठामध्ये वांद्रे पूर्व या मतदारसंघावरही एकमत झाले नसून हाही एक वादग्रस्त मतदारसंघ आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून त्याचे बनर्स विभागात दिसू लागले होते. (Bandra East Constituency)

वादात भर पडली

या मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे झिशान सिद्दीकी असून नुकताच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा करणे स्वाभाविक होते मात्र शिवसेना उबाठाने सांगलीप्रमाणे परस्पर उमेदवार घोषित केल्याने वादात भर पडली आणि आता वाद विकोपाला गेला आहे. (Bandra East Constituency)

(हेही वाचा – PIT NDPS Act रोखणार मुंबईतील बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी)

उबाठाकडून परस्पर उमेदवारी

लोकसभा निवडणुकीआधी सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना सांगलीत जाऊन परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. शिवसेना उबाठाने मात्र चंद्रहार यांच्या उमेदवारीचा हट्ट सोडला नाही. अखेर कदम यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस हायकमांडकडे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पण काँग्रेसने उबाठाशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला. (Bandra East Constituency)

काँग्रेसची बंडखोरी

काँग्रेस हायकमांडचे न ऐकता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने मात्र त्यांच्यावर कोणतीही शिस्तभांगाची कारवाई केली नाही. अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना मदत केली आणि अपक्ष म्हणून निवडूनही आणले तर शिवसेना उबाठाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. (Bandra East Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.