शेख हसीना यांच्या पलायनानंतर अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत. त्याच वेळी बांगलादेश (Bangladesh) सरकार भारताचा शत्रू पाकिस्तानशी जवळीक साधत आहे आणि शस्त्रेे खरेदी करत आहे. पाकच्या साहाय्याने भारतात जिहादी आतंकवाद पसरवण्याची योजना आखत आहे. या संदर्भात अमेरिकेत रहाणारे पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती आणि पाकिस्तानी प्रकरणांचे तज्ञ साजिद तरार यांनी भारताला सतर्क रहाण्याचा सल्ला दिला.
भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्या सीमेजवळ ‘जिहाद पुकारणार’, अशा घोषणा दिल्या जात आहेत. भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी पाकिस्तानकडे केवळ २५ हजार टन साखरेची मागणी केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचीही मागणी केली आहे. भारताच्या सीमेच्या दोन्ही बाजूंनी (पाकिस्तान आणि बांगलादेश) जिहादच्या घोषणा दिल्या जात असल्याने आतंकवादी कारवायांच्या विरोधात भारताला पूर्ण तयारी करावी लागेल आणि कठोर कारवाई करावी लागेल.
(हेही वाचा Sansad बंद पाडणाऱ्या पक्षाकडून नुकसान भरपाई वसुली करावी; डॉ. निरगुडकरांचे परखड भाष्य)
बांगलादेशाने (Bangladesh) पाकिस्तानकडून ४० टन आर्.डी.एक्स., २८ हजार उच्च तीव्रतेचे रॉकेट्स, रणगाड्यांचे २ हजार गोळे आणि ४० हजार तोफगोळे यांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महंमद युनूस यांनी पाकिस्तानी लोकांसाठी बांगलादेशाच्या व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला व्हिसा मिळवण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागत असे. आता हा नियम रद्द करण्यात आला आहे. यामुळे इस्लामी आतंकवाद्यांना सहजपणे बांगलादेशात प्रवेश करता येईल आणि नंतर सीमा ओलांडून भारतात प्रवेश करता येईल, असेही तरार म्हणाले.
भारतातील काही लोक भूतकाळातील अनुभव आठवून खूप अस्वस्थ झाले आहेत. या लोकांचा असा विश्वास आहे की, बांगलादेश नॅशनल पार्टी वर्ष १९९१ ते १९९६ आणि पुन्हा वर्ष २००१ ते २००५ या काळात सत्तेत होती. या कार्यकाळात लष्कर-ए-तोयबा संघटनेचे आतंकवादी, मसूद अझहर आणि सज्जाद अफगाणी यांसारख्या आतंकवाद्यांनी बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश केला होता आणि मुंबईवर आक्रमण केले होते. आतंकवादी डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा जे अमेरिकी होते, त्यांचेही बांगलादेशाशी (Bangladesh) जवळचे संबंध होते. डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांनी मुंबई आक्रमणासाठीची माहिती गोळा केली होती. बांगलादेशाने पुकारलेल्या जिहादच्या अंतर्गत भारतातील काही लोक बांगलादेशाच्या वतीने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा देण्यास चालू करतील. या सर्व गोष्टींमागे पाकिस्तानची आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) ही गुप्तचर संस्था आहे, असेही तरार म्हणाले.
Join Our WhatsApp Community