रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतने बांगलादेशी नागरिकाला (Bangladesh Muslim Citizen) चक्क बोगस जन्म दाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा बांगलादेशी नागरिक एका गुन्ह्याखाली सध्या गजाआड आहे. पोलिसांनी आता हा जन्म दाखला दिलेल्या तत्कालीन सरपंचासह, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे.
या जन्म दाखल्यासाठी आई-वडिलांचा कायमचा पत्ता उद्यमनगर पडवेकर कॉलनी जि. रत्नागिरी असे दाखवण्यात आला, आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख, वडील मोहम्मद इसाक शेख असे सांगून खोटा जन्म दाखला 4 मार्च 2020 ला बनवून देण्यास सहकार्य केल्याने शिरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ज्यांनी शिफारस दिली त्या सदस्यांना आरोपी करण्यात आले आहे. (Bangladesh Muslim Citizen)
दरम्यान या प्रकरणात मुंबई पोलिसांनी संबंधित सरपंचाला चौकशीसाठी बोलवल्याचे पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या बांगलादेशी नागरिकांची (Bangladesh Muslim Citizen) कोणतीही चौकशी न करता त्या बांगलादेशी नागरिकाला भारतात जन्म झाला असल्याचा दाखला दिलाने या प्रकरणात मुंबई पोलिसांनी लक्ष घातले. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 179 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अन्वये कलम 35 (तीन) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अन्वये या कलमाद्वारे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यातील 336(2) 337, 338, 339, 340(2)319(2)3(5) भारतीय न्याय संहिता 2023सह नियम 3 पारपत्र भारतात प्रवेश अधि.1920 सह नियम 6 पारपत्र भारतात प्रवेश अधिनियम सह कलम 13,14, (अ ) (ब) परकीय नागरिक अधिनियम 1946या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद इद्रीस मोहम्मद इशाक शेख उर्फ नसीम वय 42 वर्षे नाव जोशीमुद्दीन बिशू देवान हा मूळ बांगलादेशीय नागरिक (Bangladesh Muslim Citizen) याला 03 ऑक्टोबर 2024 ला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
Join Our WhatsApp Community