Bangladesh Protests : बांगलादेशात सरन्यायाधीशांचे घरही बनले आंदोलकांचे टार्गेट, मंदिरात तोडफोड

166
Bangladesh Protests : बांगलादेशात सरन्यायाधीशांचे घरही बनले आंदोलकांचे टार्गेट, मंदिरात तोडफोड
Bangladesh Protests : बांगलादेशात सरन्यायाधीशांचे घरही बनले आंदोलकांचे टार्गेट, मंदिरात तोडफोड

मागच्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांग्लादेशात (Bangladesh Protests) असंतोष धुमसत होता. या सगळ्याची परिणीती अखेर शेख हसीना यांच्या राजीनाम्यात झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की, काल तातडीने शेख हसीना यांना देश सोडावा लागला. शेख हसीना (Sheikh Hasina) सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील हिंडन एअर बेसवरील गेस्ट हाऊसमध्ये त्या थांबल्या आहेत. शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतरही तिथे हिंसाचार थांबलेला नाही. वेगवेगळ्या भागात तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत.

५ हिंदू मंदिरांची तोडफोड
बांगलादेशात सोमवारी अराजकता पसरली. आंदोलकांनी पीएम निवासस्थानावर लूटमार केली. गृहमंत्री असदुझ्झमन खान तसेच सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. अवामी लीगचे कार्यालय जाळण्यात आले. याशिवाय आणखी २ कारागृहे फोडून हजारो कैद्यांना सोडले. अवामी लीगच्या शंभरावर कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चितगावमध्ये ५ हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर अनेक भागात हिंदू आणि अहमदिया समाजासारख्या अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. (Bangladesh Protests)

‘बंगबंधु भवन’ मध्ये तोडफोड
बांग्लादेशच्या बॉर्डर गार्डच्या जवानांना परत बोलवण्यात आलं आहे. फक्त सैन्य बांग्लादेशच्या रस्त्यावर तैनात आहे. पण त्यांची संख्या कमी आहे. बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचं निवासस्थान ‘बंगबंधु भवन’ (Bangabandhu Bhavan) मध्ये तोडफोड करण्यात आली. तिथे जाळपोळ झाली. ढाका येथे धानमंडीमध्ये ऐतिहासिक इमारत आहे. शेख मुजीबुर रहमान यांनी त्या इमारतीचा वापर खासगी निवासस्थान म्हणून केला होता. 1975 साली शेख मुजीबुर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची याच घरात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सुदैवाने शेख हसीना या हल्ल्यातून वाचल्या. कारण त्यावेळी त्या परदेशात होत्या. ही इमारत एक राष्ट्रीय स्थळ आहे. या इमारतीला बंगबंधु स्मारक संग्रहालयात बदलण्यात आल आहे. (Bangladesh Protests)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.