Bangladesh Violence : हिंदूंवरील अत्याचारप्रकरणी अमेरिकेने हस्तक्षेप करावा; अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांची मागणी

बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) आणि अस्थिरता स्पष्टपणे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या हिताचे नाही. त्यामुळे अमेरिकेने मुख्य सल्लागार युनूस सरकारशी थेट बोलण्याची विनंती करतो, असे खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले.

106

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराचे (Bangladesh Violence) पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. तेथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ लागली आहे. या प्रकरणी अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी अमेरिकेतील परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि उत्तरदायी व्यक्तींना न्याय देण्यासाठी अंतरिम सरकारशी संपर्क साधण्याची विनंती केली. या प्रकरणी त्यांनी पत्रही लिहिले आहे.

(हेही वाचा Azad Maidan Riots : महाराष्ट्राच्या मानहानीची लक्तरे १२ वर्षांनंतरही चव्हाट्यावरच)

अमेरिकेने मुख्य सल्लागार युनूस सरकारशी थेट बोलण्याची केली विनंती

खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी पत्रात म्हटले आहे की, बांगलादेशात आता महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. हिंसाचार संपवण्यासाठी आणि हिंदू पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिकेने तेथील सरकारशी संबंध निर्माण करावेत. खेदाची गोष्ट आहे की, बांगलादेशात सरकारच्या विरोधातील आंदोलनाने हिंदूविरोधी हिंसाचाराचे (Bangladesh Violence) रूप धारण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०२१ मध्ये हिंदूविरोधी दंगलीत ९ जणांचा बळी गेला होता. शेकडो घरे, व्यवसाय आणि मंदिरे उद्ध्वस्त झाली होती. वर्ष २०१७ मध्ये १०७ हिंदू मारले गेले आणि ३७ लोक बेपत्ता झाले होते. बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) आणि अस्थिरता स्पष्टपणे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या हिताचे नाही. त्यामुळे अमेरिकेने मुख्य सल्लागार युनूस सरकारशी थेट बोलण्याची विनंती करतो, असे खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.