Bangladesh Violence : …तर ढाक्यावर बॉम्ब वर्षाव करून बांगलादेशला ठिकाणावर आणा; आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ मयांक जैन यांचे मत 

जैन यांनी वर्ष २००१ मध्ये ‘बांगला क्रिसेंट’ नावाचा एक माहितीपट दिग्दर्शित केला होता. त्यामध्ये त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि हिंदूंची दैनावस्था यांवर प्रकाश टाकला होता.

156

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर (Bangladesh Violence) आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ मयांक जैन यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते भारताने बांगलादेशातील हिंदूंना जमीन देऊन त्यांचे रक्षण केले पाहिजे, तसेच सैन्याला पाचारण केले पाहिजे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय सैन्य यांचे १० हजार ट्रक यांना सीमेपासून २०० किलोमीटर आत तैनात केले पाहिजे. आसाममधील तेजपूर आणि बंगालच्या बागडोगरा या भारतीय वायूदलाच्या तळांमध्ये राफेल विमानांद्वारे गस्त घातली पाहिजे. अशा प्रकारे सैनिकी दबाव आणूनही बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर ढाक्यावर बाँबचा वर्षाव करून तेथील सरकारचे डोके ठिकाणावर आणा, असे विधान दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ मयांक जैन यांनी केले.

(हेही वाचा Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)

बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणा  

जैन यांनी वर्ष २००१ मध्ये ‘बांगला क्रिसेंट’ नावाचा एक माहितीपट दिग्दर्शित केला होता. त्यामध्ये त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि हिंदूंची दैनावस्था यांवर प्रकाश टाकला होता. बांगलादेशातील अराजक (Bangladesh Violence) आणि त्यानंतर तेथील हिंदूंवर सुरु असलेले अनन्वित अत्याचार यावर आता आंतर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली आहे. हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताकडून बांगलादेशातील अंतरिम सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जैन म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंना वाटते की, शेजारी असलेले भारतातील १०० कोटी हिंदू त्यांच्यासाठी काही करत नाहीत. ‘नेहरू-लियाकत अली करारा’नुसार आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांची आपण काळजी घेतली पाहिजे. बांगलादेशाच्या निर्मितीनंतरही शेख मुजीबूर रहमान यांच्यासमवेत असा करार झाला होता; परंतु बांगलादेशाने तसा प्रयत्न खर्‍या अर्थाने कधीच केला नाही. आता तर तेथील सर्वच अल्पसंख्यांक हिंदूंना भारतात आणले पाहिजे. यामुळे बंगाल आणि आसाम येथील धार्मिक स्तरावर झालेल्या इस्लामीकरणावर परिणाम होऊ शकेल. भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या हिंदूंना भारतात घेतले पाहिजे. हिंदूंची ओळख वैद्यकीयदृष्ट्या सहजपणे केली जाऊ शकते, असेही जैन म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.