ब्रिटिश संसदेत Bangladesh Violence मुद्यावर झाली चर्चा; काय म्हणाले खासदार?

बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

78

ब्रिटिश खासदारांनी बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, बांगलादेशमध्ये शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर हिंदूंना नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ब्लॅकमन म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे जाळण्यात (Bangladesh Violence) आली आहेत. त्यांची दुकाने व घरांची तोडफोड केली जात आहे. पुजाऱ्यांना अटक केली जात आहे. ब्लॅकमन म्हणाले की, या प्रकरणावर कारवाई करण्याची जबाबदारी ब्रिटनची आहे, कारण त्यांनीच बांगलादेशला मुक्त केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्री कॅथरिन वेस्ट यांनी सांगितले की, आम्हाला भारत सरकारच्या चिंतेची जाणीव आहे. गेल्या महिन्यात त्या बांगलादेशला गेल्याचे वेस्ट यांनी सांगितले. यावेळी युनूस सरकारने अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले होते.

(हेही वाचा Eknath Shinde यांना शपथ घेताना आठवले बाळासाहेब, दिघे आणि मोदी)

कंझर्व्हेटिव्ह खासदार प्रीती पटेल म्हणाल्या की, बांगलादेशमध्ये हिंसाचार (Bangladesh Violence) सुरू आहे जो सरकार थांबवू शकत नाही. याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे. आमची सहानुभूती बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंसोबत आहे. त्याचवेळी लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर म्हणाले की, ब्रिटिश सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचारावर अमेरिकाही नाराज 

बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. राज्य विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, सरकारने भाषण स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांचा आदर करणे आवश्यक आहे. पटेल म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अटकेत असलेल्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांना मानवाधिकारानुसार वागणूक दिली पाहिजे. (Bangladesh Violence)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.