Bangladesh Violence : मुसलमान हिंदूंकडे मागत आहेत सोने, पैसे आणि मुली; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

361

बांगलादेशात (Bangladesh) अंतरिम सरकार स्‍थापन झाल्‍यानंतरही हिंदूंवर (Hindu) हिंसाचार चालूच आहे. हिंदूंकडे खंडणीमध्‍ये सोने, पैसे, इतकेच नव्‍हे, तर मुलींना मागितले जात आहे. यामुळे पीडित हिंदू भारताकडे व्‍हिसाची मागणी करत आहेत, ते व्‍हिसा नसतानाही सीमा ओलांडण्‍यास तयार आहेत. .

एका हिंदूने सांगितले की, १५ ऑगस्‍ट या दिवशी १० ते १२ दुचाकीस्‍वार चाकू, हातोडा आणि विळा घेऊन त्‍याच्‍या घरी पोहचले, जेव्‍हा त्‍यांना समजले की, तो घरी नाही, तेव्‍हा ते निघून गेले आणि मोबाईल करून धमक्‍या देऊ लागले. त्‍यामुळे या व्‍यक्‍तीला नातेवाईकाच्‍या ठिकाणी लपून रहावे लागले. (Bangladesh Violence) जसोर येथे एका आश्रमात मत्‍स्‍यपालन व्‍यवसायाशी संबंधित २ हिंदूंनी सांगितले की, त्‍यांच्‍याकडून २ – ३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अन्‍यथा ‘तुझ्‍या मुलाचे अपहरण करू’, अशी ते धमकी देत आहेत. ‘बांगलादेशात आम्‍हाला भविष्‍य नाही आणि आपली सर्व भूमी आणि मालमत्ता सोडून भारतात स्‍थायिक व्‍हायचे आहे’, असे त्‍यांनी सांगितले. तेथील त्‍यांचे कामही थांबले आहे.

मत्‍स्‍यपालन आस्‍थापनात काम करणार्‍या एका हिंदूने सांगितले की, आमच्‍या मालकाला धमक्‍या दिल्‍या जात आहेत. ‘मालकाकडून पैसे काढून घ्‍या, अन्‍यथा त्‍यांच्‍या गायी घेऊन जा’, असे आम्‍हाला सांगण्‍यात येत आहे. मालकाला धमकी देणारे लोक या कंपनीत काम करणार्‍या हिंदूंच्‍या ओळखीचे आहेत. ते बांगलादेश नॅशनल पार्टीशी (बी.एन्.पी.शी) संबंधित आहेत. ते सोने, पैसे आणि मुली यांची मागणी करत आहेत. अनेक मुलींवर बलात्‍कार झालेले आहेत; पण त्‍यांची व्‍यथा त्‍या सांगू शकत नाहीत. आम्‍ही बी.एन्.पी.च्‍या लोकांना पैसेही दिले आहेत. नव्‍या सरकारवर आमचा अजिबात विश्‍वास नाही. आता बांगलादेशात हिंदूंना नोकर्‍या मिळू शकत नाहीत. सरकारी लोकच आम्‍हाला त्रास देत आहेत. सैन्‍य आणि पोलीस यांचा पत्ताच नाही. एका प्राथमिक शिक्षकावरही हल्ला झाला आहे. (Bangladesh Violence) त्‍यांना पळून जावे लागले. गावातील मंदिरांचे रक्षण करावे लागेल. पोलीस अधिकारीही पीडित हिंदूंना भेटायला तयार नाहीत. एका विद्यार्थ्‍याने सांगितले की, बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या घरांवर चिन्‍हे लावण्‍यात आली आहेत आणि खंडणीची मागणी केली जात आहे. या विद्यार्थ्‍याचे पालक वृद्ध असून ते चितगाव येथे रहातात. महाराष्‍ट्रातील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन ढाका येथे नोकरी करणार्‍या या हिंदु विद्यार्थ्‍याच्‍या कुटुंबाला बांगलादेश सोडण्‍यास सांगण्‍यात आले आहे. ५ लाख रुपयांची मागणी करणार्‍या व्‍यक्‍तीने मोबाईलवर स्‍वत:ची ओळख इस्‍लामी गटाचा सदस्‍य असल्‍याची करून दिली आहे. इतर हिंदूंनाही असे फोन येत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.