Bangladesh Violence : सरकार पुरस्कृत हिंदूंवरील निर्घृण अत्याचार हाच बांगलादेशाचा इतिहास

इस्कॉनसारखी धर्मनिरपेक्ष संस्था जगात नाही. ते पुन्हा हिंदू-मुसलमान सगळे सारखेच आहेत, असे तुणतुणे जगभर वाजवतात. बांगलादेशात ज्यावेळेला हिंदूंवर अत्याचार झाले, इस्कॉनची मंदिर तोडली, त्यानंतर तिथे प्रचंड पूर आला, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुरात न भूतो न भविष्यती नुकसान झाल्यानंतर याच इस्कॉनने पुन्हा मोठ्या प्रमाणावर लोकांना खाऊ वाटला, मुसलमानांना कपडे दिले.

111
  • सुनील देवधर  

बांगलादेशातील हिंदूंवर पूर्वापारपासून अत्याचार (Bangladesh Violence) होत आलेले आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या ठिकाणी पूर्व बंगाल होता, त्याठिकाणी मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे इंग्रजांनी त्याची फाळणी करायचे ठरवले होते. विशेष म्हणजे बंगाल हा खूप मोठा प्रांत होता आणि बंगालमधून सर्वाधिक क्रांतिकारक झाले, त्यांच्या विरोध इंग्रजांना सहन करावा लागत होता, म्हणूनच बंगालचे विभाजन करणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते. पण देशातल्या सगळ्या देशप्रेमी आणि स्वातंत्र्यप्रेमी नेतृत्वांनी एकत्र येऊन जनजागरण करून इंग्रजांचे षड्यंत्र हाणून पाडले आणि मुस्लिम बहुल असलेल्या पूर्व बंगालला वेगळे राज्य होऊ दिले नाही, पण ज्या वेळेला भारत स्वतंत्र होण्याची वेळ आली, त्यावेळेला इंग्रजांनी भारताचे सामर्थ्य ओळखले होते. नैसर्गिक खनिज संपत्ती, नैसर्गिक जलवायूने भारत संपन्न आहे. एकीकडे हिमालय आणि तीन ठिकाणाहून समुद्र अशी सीमा लाभली आहे. सर्व प्रकारचे प्रचंड बुद्धिमान लोक इथे आहेत. या जोरावर भविष्यात भारत विश्वामध्ये आपली छाप टाकू शकतो आणि विश्वगुरु बनू शकतो इतकी क्षमता भारतामध्ये आहे हे इंग्रजांनी ओळखले होते. म्हणूनच भारताला कधीही बलवान होऊ द्यायचे नाही. यासाठी त्यांनी फाळणीची योजना आखली आणि भारताचे तुकडे करण्याचे ठरवले.

हिंदू-मुस्लिम भाई भाई काँग्रेसचा भंपकपणा

आपण मुस्लिम बुद्धिवाद्यांना कमजोर समजू नये, अलिगढ स्कूल ऑफ थॉट हा पहिल्यापासून हिंदू बुद्धीजीविवर हावी होत होता. त्यांच्यावर मात करत होत होता. आम्हाला सगळ्या जगाला इस्लाम करायचा आहे आणि भारताला इस्लाममय करायचे आहे असा त्यांचा उद्देश होता, त्यादृष्टीने ते पुढे पुढे सरकत होते. मुस्लिम समाजाकडून त्यांना प्रतिसादही मिळत होता आणि उलट पक्षी हिंदू नेतृत्व धर्मनिरपेक्ष होऊन बसले होते. जोपर्यंत हिंदू आणि मुसलमान एकत्र येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही, या एका भंपक आणि चुकीच्या नॅरेटिव्हच्या मागे हिंदू नेतृत्व जात होते. त्यावेळेला काँग्रेसचे नेतृत्व म्हणजेच हिंदू नेतृत्व होते. मुस्लिम नेतृत्वाने ठरवून इंग्रजांबरोबर संगनमत करून पाकिस्तानची योजना आखली, मात्र ज्यावेळी मोहनदास करमचंद गांधी फाळणीसाठी तयार नाहीत हे कळले, तेव्हा मुस्लिम नेतृत्वाने घाबरवण्यासाठी डायरेक्ट ॲक्शनचा कॉल दिला. १६ ऑगस्ट १९४६ या दिवशी कलकत्यामध्ये दहा हजार हिंदूंची कत्तल करून रस्त्यावर फेकून दिले, नवखालीत लाखोंच्या संख्येने हिंदू महिलांवर बलात्कार केले. त्यावेळी गांधी स्वतः तिकडे गेले आणि प्रतिकारासाठी उभ्या राहिलेल्या हिंदूंना तुम्ही शस्त्र घेऊ नका, असे सांगू लागले. मुसलमानांना समजवण्यासाठी गेले नाहीत.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान )

बांग्लादेश संपूर्ण मुसलमान देश बनवण्याचे षड्यंत्र

हे सगळे सुरु असताना एक अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशा निर्णयामध्ये पूर्व बंगालला एक वेगळा देश म्हणून पूर्व पाकिस्तान म्हणून जन्माला यावे लागले. पण असे नाही की, तिथे हिंदूंवर तेव्हाच अत्याचार होत होते, मी त्रिपुराचा प्रभारी राहिलेलो आहे. त्रिपुराला ८० टक्के सीमारेषा ही बांगलादेशाची आहे.१९३५-३६ च्या सुमारास हजरत बल दर्गा जो कश्मीरमध्ये आहे, त्यातील मोहम्मद पैगंबरांचा केस गायब झाला, त्यानंतर प्रचंड दंगली देशभरामध्ये झाल्या. त्या पैगंबरांचा कुठला केस कुठे गायब झाला आणि त्याच्यासाठी दंगली सगळ्या भारतामध्ये झाल्या. लक्षात घ्या कधीही हिंदू-मुसलमान दंगली हा शब्द वापरू नका, हिंदू दंगली करत नाहीत, दंगली मुसलमानच करतात. हिंदूंना नाईलाजाने स्वतःच्या बचावासाठी प्रत्युत्तर द्यावे लागते. म्हणून मुसलमानांनी केलेल्या दंगलींमध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदूंच्या हत्या झाल्या आणि पूर्व बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम असल्यामुळे त्यांनी हिंदूंवरती प्रचंड हल्ले केले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्व बंगालमधून हिंदू निर्वासित बनून त्रिपुराच्या सीमेमध्ये घुसले. मुसलमानांची संख्या वाढवण्यासाठी आणि हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी दंगली करून बंगालमधून मोठ्या प्रमाणावर हिंदूंना त्रिपुरामध्ये निर्वासित म्हणून जाण्यास भाग पाडले. त्यावेळी नेहरूंच्या अदूरदर्शीपणामुळे फाळणीच्या वेळेला ते सगळा बंगाल देऊन टाकायला निघाले होते, त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांच्यामध्ये हिंदुत्व बघितले. हिंदू महासभेचे अध्यक्षपद स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना दिले होते, ते त्यांनी आनंदाने स्वीकारले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी फाळणीच्या वेळेला सगळ्या काँग्रेसच्या नेतृत्वाला ‘बंगाल मुस्लिम बहुल नाही, बंगालला तुम्ही पाकिस्तान बनवू नका’, असे सांगितले. पश्चिम बंगाल जो आज आपल्या देशामध्ये आहे तो तुम्ही पाकिस्तानात देऊ नका तो हिंदू बहुल आहे तो भारतात राहिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जनमत उभे केले, त्यामुळे काँग्रेसला झुकावे लागले आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये आला. पश्चिम बंगाल आज भारतात आहे, त्याचे सगळे क्रेडिट डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना जाते. १९७१ ला शेख मुजीबुर रहमानांनी सांगितले की, आम्ही मुसलमान आहोत पण आमची भाषा आणि संस्कृती बंगाली आहे, म्हणून आम्हाला पाकिस्तानबरोबर राहायचे नाही, आम्हाला आमचा स्वतंत्र बांगलादेश पाहिजे, असे सांगत बांगलादेशाची मागणी केली आणि बांगलादेशाची निर्मिती झाली.

शेख हसिनाच्या राजवटीतही हिंदूंवर अत्याचार

त्यावेळेलाही इंदिरा गांधींनी ॲक्शन घेतली, बांगलादेशाच्या विरोधात युद्ध केले. तेव्हाही लाखो हिंदू महिलांवरती बलात्कार झाले (Bangladesh Violence). कारण त्या वेळेला पाकिस्तानच्या नेतृत्वाला वाटले की, पूर्व पाकिस्तानला वेगळे होण्याची इच्छा ही फक्त मुजीबुर रहमान यांची नाही, तर तेथील कोट्यवधी हिंदूंची आहे. १९७१ मध्येही मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार झाले. तेव्हाही हिंदूंचे लोंढे पूर्व पाकिस्तानातून बाहेर पडले आणि पश्चिम बंगाल, आसाम, मेघालयात गेले ते हिंदूंचे लोंढे त्रिपुरामध्येही पुन्हा गेले आणि १९७१ नंतर बांगलादेश झाल्यानंतर हिंदूंना थोडे बरे दिवस लाभले, जेंव्हा तिथे मुजीबुर रहमान आणि शेख हसीना यांचे राज्य होते, पण जेव्हा जेव्हा खालिदा जियाचे राज्य राहिले, तेव्हा इस्लाम प्राबल्य वाढले. याठिकाणी जेव्हा जेव्हा सरकार बदलते, परिवर्तन होते, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट हिंदूंना केले जाते. शेख हसीनाचे राज्य असतानाही हिंदूंवरती अत्याचार होत होते, फक्त संख्या कमी होती. खालिदाचे प्रशासन हे औरंगजेबाचे असेल तर शेख हसीनाचे अकबराचे होते. बांगलादेशातील हिंदूंची मंदिर बळकावणे आणि ती तोडून त्या ठिकाणी मशिदी बनवणे हे शेख हसीनाच्या वेळेला देखील झालेले आहे, त्याच्यामुळे हिंदूंनी जागृत झाले पाहिजे, हिंदूंना कळले पाहिजे की, मुसलमान हा मुसलमान असतो. त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे. या सगळ्या प्रकारचे जिहाद हे कायम बांगलादेशात चालू आहेत. शेख हसीना असताना त्याची मात्रा थोडी कमी असते किंवा त्याचे जे स्वरूप आहे हे वेगळे असते.

इस्कॉनच्या धर्मनिरपेक्षतेतून धडा घ्या 

आता बांगलादेशची सत्ता महंमद युनूस यांच्याकडे आहे. त्यांच्या हातात सत्ता येताच त्यांनी आपला खरा रंग दाखवला. हिंदूंवर प्रचंड अत्याचार करत आहेत. विषय इस्कॉनचा निघाला. इस्कॉनसारखी धर्मनिरपेक्ष संस्था जगात नाही. ते पुन्हा हिंदू-मुसलमान सगळे सारखेच आहेत, असे तुणतुणे जगभर वाजवतात. बांगलादेशात (Bangladesh Violence)  ज्यावेळेला हिंदूंवर अत्याचार झाले, इस्कॉनची मंदिर तोडली, त्यानंतर तिथे प्रचंड पूर आला, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुरात न भूतो न भविष्यती नुकसान झाल्यानंतर याच इस्कॉनने पुन्हा मोठ्या प्रमाणावर लोकांना खाऊ वाटला, मुसलमानांना कपडे दिले. आपल्याला हे का कळत नाही की, सापाला दूध जरी पाजले तरी त्याचे रूपांतर विषामध्येच होते आणि तेच विष आज इस्कॉनवर उलटून पडले आहे. इस्कॉन आमच्यासाठी हिंदुत्व आहे, आमच्यासाठी हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारेच आहेत. ते काय विचार करतात हा मुद्दा निराळा आहे. आमच्यासाठी इस्कॉन म्हणून हिंदुत्वच आहे आणि आमच्यासाठी त्यांचे जे संत आहेत, त्यांची सुरक्षा ही विश्वसमुदायाची जबाबदारी आहे.

(हेही वाचा Bangladesh मध्ये हिंदू मंदिरांतील मूर्त्यांची धर्मांधांकडून तोडफोड; हिंदूंचा आक्रमक पवित्रा)

हिंदूंनी लढण्याची मानसिकता करावी

हिंदूंनी राजकारणाचे हिंदूकरण केले पाहिजे आणि हिंदूंचे सैनिकीकरण केले पाहिजे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितले होते. आता हिंदूंचे सैनिकीकरणाचा अर्थ काय आहे, तर सगळ्या हिंदूंनी आपल्या घरी शस्त्र बाळगली पाहिजे जी कायद्याने परवानगी असलेली हवीत. ती शस्त्रे सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवली पाहिजेत. आपल्या येणाऱ्या युवा पिढीला लहानपणापासून आपल्या घरामध्ये तलवार, धनुष्यबाण, कुऱ्हाड दिसली पाहिजे, कुऱ्हाड हे गणपतीचे शस्त्र आहे, त्या कुऱ्हाडीने गणपतीने अनेक असुरांचा वध केलेला आहे. महाराष्ट्र सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा करणारे राज्य आहे. गणेशाच्या मूर्ती बनवणारा कुठल्या गणपतीच्या हातात कुऱ्हाड दिसते, गायब झाली आहे. म्हणजे आम्ही इतके सेक्युलर झालो की, आम्ही गणपतीला देखील शांतीप्रिय करून टाकले, अहिंसावादी बनवले, त्याच्यामुळे माझे तर आव्हान आहे हिंदू समाजाला, मूर्तिकारांना, तुम्ही पुढच्या वर्षीच्या ज्या गणेश मूर्ती बनवायला सुरुवात कराल, त्यात ज्या गणपतीच्या मूर्तीच्या हातामध्ये कुऱ्हाड नसेल, तर हिंदूंनी ती मूर्ती विकत घेऊ नये. मुसलमान तर शस्त्राशिवाय काही बोलत नाही. खेचून खेचून तलवारीने हत्या करतात. आपल्याला लाज नाही वाटत, आपण गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड नाही ठेवत, हिंदूंचे सैनिकीकरण जे सावरकरांनी सांगितले त्याचा अर्थ काय, एक तर सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे. काही नाही तर निदान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन दंड तरी शिका. कारण ज्यावेळेला संघाला विचारले जाते की तुम्ही दंडाने काय करणार? मी सांगतो, दंड शिकल्याने लढण्याची मनाची तयारी होते. शस्त्र कुठलेही असू शकते. आज माझ्या मनात जर हिंदू म्हणून लढण्याची हिमंत निर्माण झालेली असेल, तर ती संघाच्या शाखेमुळे झाली आहे, ती दंड शिकल्यामुळे झालेली आहे. सगळ्या महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना विसरल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखी पहिली महिला आहे जिने सेना निर्माण केली. त्यांनी महिलांना शस्त्राचे प्रशिक्षण दिले. महाराणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, रुद्रमां चेन्नम्मा सारख्या राण्यांचा आदर्श महिलांच्या समोर, मुलींच्या समोर, युवतींसमोर ठेवले पाहिजे. अशा लढाऊ वीरांगणाचा आदर्श आमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवले पाहिजे. (Bangladesh Violence)

हिंदूंनीही जबाबदारी स्वीकारावी

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल वाचला का, मुसलमानांचे लोकसंख्येचे आक्रमण, अतिक्रमण, डेमोग्राफिक अग्रेशन पहा. २०५० पर्यंत मुंबईत ५० टक्के मुस्लिम लोकसंख्या होईल. ५० टक्के मुस्लिम फक्त २५ वर्षांमध्ये म्हणजे, तुमचा मुलगा, मुलगी आज १०-१५ वर्षांचे असेल तर ते २० वर्षांचे होतील तेव्हा असू की नाही माहिती नाही. पण २०५० मध्ये कुठली मुंबई आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत. पुढच्या पिढीला पूजनीय सरसंघचालकांनी जे विधान केले, त्याच्याशी मी १०० टक्के सहमत आहे. हिंदूंना तीन मुले असलीच पाहिजेत. मुलाला सगळे द्यायचे आहे, त्याला सगळी सुख द्यायची आहेत, म्हणून आम्हाला एकच मूल पाहिजे, असे हिंदू म्हणतात. अरे बाबांनो, आयुष्यभर तुमच्या त्या एका मुलाला जारी सगळी सुख द्यायची असेल, तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा दोन भावंड द्या नाहीतर तो सुरक्षित राहणार नाही. ज्यावेळी त्याला मुसलमान मारायला येतील, त्यावेळेला तो म्हणेल तुम्ही काय होतात? हिंदूंची संख्या कमी का झाली?, अशी विचारणा ते मूल तुम्हाला करेल. सध्याच्या बांगलादेशाच्या (Bangladesh Violence)  स्थितीमध्ये सरकारला जे करायचे ते सरकार करेल. माझा पूर्ण विश्वास सरकारवर आहे. मी नेहमी हिंदुत्वनिष्ठांना दोन गोष्टी सांगतो की उतावळे होऊ नका. साईबाबांनी सांगितलेली दोन मार्गदर्शन तुम्ही माना. साईबाबांनी सांगितले श्रद्धा आणि सबुरी. त्यामुळे श्रद्धा ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या आपल्या देशाच्या नेतृत्वावर तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की, ते जे काही करतात ते आपल्या भारताच्या, जगाच्या, हिंदूंच्या हिताचे करतात. त्यांना प्रश्न विचारू नका. दुसरी गोष्ट सबुरी. वाट बघा. पहिल्या पाच वर्षात राम मंदिर झाले नव्हते, पहिल्या पाच वर्षांमध्ये ३७० कलम रद्द केले नव्हते, पहिल्या पाच वर्षांमध्ये सीएए कायदा झाला नव्हता, पहिल्या पाच वर्षांमध्ये एवढी प्रचंड एनआयएची ताकद वाढली नव्हती, अँटी टेररिस्ट सगळे नेटवर्क संपवली नव्हती, आता हे सगळी कामे झाली आहेत, आपण पहिली पाच वर्षे मोदींची आणि नंतरची पाच वर्षे जर तुलना केली, तर तुम्हाला पंतप्रधान मोदी अधिक कठोर झालेले दिसतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणे, त्यांना प्रश्न न विचारणे हे आपण केले पाहिजे. तसेच सगळेच त्यांच्यावर सोपवूनही चालणार नाही.

बांगलादेशातील हिंदूंसाठी हिंदूंनी एकत्र यावे

हिंदूंनी आपले कर्तव्य पालन केले पाहिजे. एक ट्विट पहिला, बांगलादेशातील (Bangladesh Violence) हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात जर्मनीमध्ये हिंदू एकत्र आले, जगामधल्या शंभरहून अधिक देशांमध्ये असे का होऊ शकत नाही? भारताच्या मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये यासाठी हिंदू का एकत्र येऊ शकत नाही? यासाठी काँग्रेसचे हिंदू, भाजपाचे हिंदू, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदू, राज ठाकरे यांचे हिंदू जातपात विसरून, राजकीय मतभेद विसरून हिंदूंच्या सुरक्षेसाठी का एकत्र येत नाही? बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेच्या मागणीसाठी मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम येथे हिंदू आंदोलन का करत नाहीत? प्रत्येक वेळी संघाकडे, विश्व हिंदू परिषदेकडे बघत बसल्याने थोडीच काही होणार आहे? हिंदू समाजाचीही जबाबदारी आहे. ज्या ज्या हिंदूला असे वाटते की, आंदोलनाच्या ठिकाणी माझ्याकडून किमान ५० हिंदू तिथे जमले पाहिजेत, तर त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. सोशल मीडिया वॉरिअर बना, तुम्हाला ट्विटर येत नसेल तर ट्विटर शिका, हिंदुत्वासाठी ट्विटर शिका, हिंदुत्वासाठी छोटे छोटे रील बनवा, आजकालची १५-२० वर्षांची मुले फक्त रील बघत बसतात, त्यात सगळा फालतू कचरा भरलेला असतो. तिथे तेजस्वी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाच्या कथा चांगले ॲनिमेशन वापरून एक एक मिनिटाची रील बनवून टाकले पाहिजेत. हिंदुत्वाचा ज्वार निर्माण झाला पाहिजे. आपण हिंदू म्हणून करू शकतो, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.