भारतासोबतचे संबंध बिघडवल्यास Bangladesh चे होणार मोठे व्यापारी नुकसान

52

बांगलादेशात (Bangladesh) झालेल्या सत्ताबदलानंतर बांगलादेशाकडून पाकिस्तानशी (Pakistan) जवळीक वाढू लागली आहे. बांगलादेश पाककडून साखर, बटाटे आदी साहित्य आयात करू लागला आहे. या वस्तू आतापर्यंत भारताकडून पाठवल्या जात होत्या; परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर बांगलादेश भारताचा एक धक्काही सहन करू शकणार नाही. बांगलादेश भारताकडून गहू, कांदा, लसूण, कापूस, धान्ये, पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, स्टील इत्यादींची खरेदी करतो आणि तो मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. दुसरीकडे भारत बांगलादेशाचा आशियातील दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. बांगलादेशाने भारतासमवेतचे संबंध बिघडवल्यास त्याची मोठी व्यापारी हानी होईल, असे जागतिक तज्ञांचे मत आहे. (India-Bangladesh Relations)

(हेही वाचा – नौदलात एकाच दिवशी दाखल होणार तीन Battle Fleet; संरक्षण क्षेत्रात देश बनत आहे आत्मनिर्भर)

बांगलादेशाने सांगितले की, बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने बटाटे आणि कांदे यांच्या किमती आणि पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी स्रोत शोधले आहेत. बांगलादेशाने सांगितले की, ते वाढत्या किमतीमुळे नवीन पुरवठादार शोधत आहेत. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे.

व्यापार्‍यांना धमक्या दिल्या जात आहेत

बांगलादेश (Bangladesh) त्याच्या उद्योगपतींवर भारताऐवजी पाकिस्तानशी व्यापार करून तेथून वस्तू खरेदी करण्यासाठी दबाव आणत आहे. तसे न केल्यास त्यांना धमकावले जात आहे. भारतासमवेत अडचणीत आल्याने बांगलादेशासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. बांगलादेश अजूनही खाण्यापिण्यासह अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशाने भारतापासून अंतर ठेवले, तर ते त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.