Nagpur Violence चे बांगलादेशी कनेक्शन? घुसखोर बांगलादेशी नागरिकाला अटक

अजीजुल रहमान असे अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे.

69

नागपूर हिंसाचारानंतर (Nagpur Violence) मुंबईत पळून आलेल्या एका घुसखोर बांगलादेशी नागरिकाला मुंबई गुन्हे शाखेने दादर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचा नागपूर हिंसाचाराशी काही संबंध आहे का? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.

अजीजुल रहमान असे अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. अजीजुल रहमान हा नागपूर येथे बेकायदेशीररित्या राहत होता, त्याच्यासोबत अनेक घुसखोर बांगलादेशी नागरिक नागपुरात बेकायदेशीरपणे  राहत होते. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur Violence) वेळी अजीजुल हा नागपुरातच होता. मात्र दंगलीनंतर तो नागपूरमधून बेपत्ता झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. नागपूर येथे बेकायदेशीर राहणारा एक बांगलादेशी घुसखोर (Nagpur Violence) नागपूर येथून पुणे मार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ ला मिळाली होती, या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने बुधवारी रात्री दादर रेल्वे स्थानक येथे सापळा रचून अजीजुल रहेमान याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा कक्ष २ मध्ये आणण्यात आले.

(हेही वाचा Uddhav Thackeray आधुनिक युगातील औरंगजेब; खासदार नरेश म्हस्के यांची टीका)

त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तो मागील ६ ते ७ वर्षांपासून नागपूर येथे राहण्यास असून त्याच्याकडे मिळालेल्या आधारकार्डमध्ये नागपूरचा पत्ता आढळून आला असून तो मूळचा बांगलादेशाचा नागरिक असल्याचे चौकशीत समोर आले आहे. गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने त्याला अटक केली असून गुरुवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार अटक करण्यात आलेला बांगलादेशी घुसखोर अजीजुल हा नागपूर हिंसाचाराच्या (Nagpur Violence) वेळी नागपूरमध्ये होता, हिंसाचारानंतर त्याने नागपूर सोडले आणि पुण्यात आला. पुण्यातून तो बुधवारी मुंबईत येताच त्याला अटक करण्यात आली आहे. अजीजुल याचा नागपूर हिंसाचारमध्ये (Nagpur Violence) सहभाग असल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेली माहिती अशी आहे की, नागपूरमधील हिंसाचारानंतर तेथे लपून बसलेले अनेक घुसखोर बांगलादेशी नागपूरमधून पळून गेले आहे. नागपूर हिंसाचारात आरोपीची काही भूमिका होती की नाही याचा तपास मुंबई गुन्हे शाखेने सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या व्यतिरिक्त त्याचे अनेक बांगलादेशी साथीदार नागपुरात त्यांची ओळख लपवून राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.