बँकांनी AI चा वापर करावा; पण जपून RBI चे गव्हर्नर काय म्हणाले?

68

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या वाढत्या धोक्यांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, AIवर जास्त अवलंबून राहिल्याने आर्थिक असुरक्षा वाढू शकते. सोमवारी नवी दिल्ली येथे आरबीआयच्या 90व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सेंट्रल बँकिंग ॲट क्रॉसरोड्स’ या विषयावरील कार्यक्रमात बोलताना दास यांनी जगभरातील वाढत्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली.

दास म्हणाले की, हे चलनविषयक धोरण आणि आर्थिक स्थिरतेसाठी चांगले नाही. भौगोलिक-राजकीय तणाव आणि हवामानाच्या जोखमीमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वित्तीय संस्थांसाठी व्यवसाय आणि नफा वाढवण्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. याशिवाय, या तंत्रज्ञानामुळे आर्थिक स्थिरतेला धोकाही वाढला आहे. या मार्केटमध्ये काही कंपन्यांचे वर्चस्व असताना हा धोका आणखी वाढतो. (RBI)

(हेही वाचा Maharashtra Assembly Election मध्ये ४ कोटी ६६ लाख महिला मतदारांची मते ठरणार निर्णायक)

AI चा फायदा घ्या, फायदा घेऊ देऊ नका

एआयची संपूर्ण यंत्रणा अजून स्पष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत, ऑडिट करणे किंवा त्यातील निर्णय घेणारे अल्गोरिदम डीकोड करणे कठीण होते. यामुळे आर्थिक बाजाराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. बँकांनी AI आणि Big Tech चा नक्कीच फायदा घ्यावा पण त्यांना फायदा घेऊ देऊ नये.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.