शिंदे गटाकडून आव्हाडांना जशास तसे उत्तर; ‘लबाड बोका ढोंग करतोय’ म्हणतं जोरदार पोस्टरबाजी

banner war between balasahebanchi shiv sena and national congress party
शिंदे गटाकडून आव्हाडांना जशास तसे उत्तर; 'लबाड बोका ढोंग करतोय' म्हणतं जोरदार पोस्टरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठाण्यात जोरदार पोस्टबाजी रंगली आहे. ‘खोका-बोका, नगरसेवकांनो, स्वत:ला विकू नका, गद्दारी जनता माफ करणार नाही’, अशी पोस्टरबाजी रविवारी ठाण्यात करण्यात आली होती. त्यालाच जशास तसे उत्तर बाळासाहेबांची शिवसेनेकडून देण्यात आले आहे. ‘लबाड बोका ढोंग करतोय’ अशा मजकूराचे पोस्टर सोमवारी ठाण्यात झळकले आहेत.

राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीवरील मजकूर

‘खोका-बोका नगरसेवकांनो स्वतःला विकू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात खोका नावाची किड महाराष्ट्राचे राजकीय संस्कार उध्वस्त करुन गेली. ही किड आता कळवा-मुंब्य्रात आली आहे. नगरसवेकांनो आता त्याच्यापासून लांब रहा. कळवा-मुंब्य्रातील जनता तुमची गद्दारी कधीच माफ करणार नाही. २००९ नंतर कळवा-मुंब्य्रात झालेला बदल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. गद्दारी जनता माफ करणार नाही,’ अशा आशयाचे पोस्टर रविवारी ठाण्यात लावण्यात आले होते.

त्यानंतर सोमवारी बाळासाहेबांची शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे आमदार आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले आहे. लबाड बोका ढोंग करतोय म्हणत आव्हाडांना टोला लगावला आहे. ‘पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट, नगरसेवक सोडून जातात तर असेल ना तुमच्यातच खोट. मुंब्रा, कळव्याच्या विकासाचं फुका लाटता श्रेय, आयत्या पिठावर रेघोट्या हेच तुमचे ध्येय. करून करून भागले, नि प्रवचन झोडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले. विश्वास नाही उरला तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर आता? आधी गळ्यात गळे आणि आता एकदम मारताय लाथा!, अशा आशयाची पोस्टरबाजी बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्याची आल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – घरोबा एका बरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर अशी मविआची अवस्था; राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here