नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी सर्व शक्ती पणाला लावली आहे. खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून राज ठाकरे हे अमित ठाकरेंसोबत २ दिवस नाशिक दौऱ्यावर गेले आहेत, मात्र त्याच दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर आणि होर्डिंग्स काढण्यात आले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नापसंती दर्शवत ‘रस्त्यावरचे फलक काढाल पण नाशिककरांच्या हृदयातून राजसाहेब आणि मनसे कशी काढाल??, असा प्रश्न विचारला आहे.
रस्त्यावरचे फलक काढाल पण नाशिककरांच्या हृदयातून राजसाहेब आणि मनसे कशी काढाल?? pic.twitter.com/o2QEhSvd9t
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 22, 2021
(हेही वाचा : सोमय्या आता ‘या’ दिवशी कोल्हापुरात भिडणार!)
नाशिक पहिले लक्ष्य!
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे बुधवार, २२ सप्टेंबरपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यामध्ये राज हे विभागप्रमुख व शाखाध्यक्षांचा मेळावा घेऊन त्यांच्याकडे प्रत्येक प्रभागाची जबाबदारी सोपविणार आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणूक होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. जुलै महिन्यापासून ठाकरे यांनी नाशिक लक्ष केंद्रीत केले आहे. काही वर्षांपूर्वी आपला गड असलेले नाशिक परत मिळवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाच्या धर्तीवर मनसेच्या शाखाध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला आहे. अमित यांच्याकडून या शाखाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अशा परिस्थिती राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स काढले जात आहे. त्यामाध्यमातून मनसेला स्थानिक प्रशासनाने वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मनसे आता कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community