- विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून सतत वावरणारे आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी असलेले चंपासिंग थापा यांना बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर मिळणारी वागणूक यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यांनतर एकनाथ शिंदे यांनी चंपासिंग थापा यांना थेट राजकारणात आणून फेरीवाल्यांचा नेता बनवले आहे. शिवसेनाप्रणित शिव फेरीवाला विक्रेता संघाच्या उपाध्यक्षपदी चंपासिंग थापा यांची निवड केली असून सध्या या संघटनेची जबाबदारी शिंदे यांनी थापांवर सोपवली आहे.
मुंबईत सध्या शिवसेनाप्रणित शिव फेरीवाला विक्रेता सेना (अधिकृत) च्यावतीने सध्या सभासद नोंदणी सुरु असून यासाठी लागलेले बॅनर हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फेरीवाला विक्रेता सेनेचे मुंबई अध्यक्ष हे बाळासाहेब पवार असले तरी या बॅनरवरील एका व्यक्तीचा फोटो हा सर्वांना आश्चर्य चकीत करत आहे. या बॅनरवर फेरीवाला विक्रेता सेनेचे उपाध्यक्षपदी चंपासिंग थापा यांचा पदनामासह छायाचित्र असून आजवर बाळासाहेबांची सावलीत वावरताना राजकरण अनुभवणारे थापा आता या विक्रेता सेनेच्या (Shiv Sena) माध्यमातून प्रत्यक्षात राजकारणात सक्रीय झालेले दिसत आहेत. या फेरीवाला विक्रेता सेनेची स्थापना एप्रिल २०२४ रोजी झाली असून माजी सहायक पोलिस आयुक्त अनंत जाधव हे या संघटनेचे सरचिटणीस आहेत.
(हेही वाचा – Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक)
थापा हा बाळासाहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हेच काम करत असे. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा मातोश्री परिवाराचा सदस्य होता. माँसाहेबाच्या पश्चात बाळासाहेबांची काळजी हेच जीवन मानून थापाने बाळासाहेबांसाठी प्रत्येक क्षण वेचला होता. परंतु बाळासाहेबांच्या मृत्यू पश्चात मातोश्रीवर चांगली वागणूक मिळत नसल्याने आधीच कंत्राटळलेल्या थापाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली आणि त्यांच्यासोबत निघून गेले. थापाच्या या शिवसेना प्रवेशामुळे मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या जवळच्या व्यक्तींना काही स्थान नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांचे असलेले रवी म्हात्रे यांनाही काही स्थान नव्हते, परंतु शिंदे यांच्यामुळे पक्षात बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रवी म्हात्रे यांना जवळ केले.
मात्र, थापा यांनी बाळासाहेबांसोबत राहून राजकारण अनुभवले असले तरी प्रत्यक्षात कधी ते राजकारणात पडले नव्हते. परंतु एकनाथ शिंदे यांनी थापा यांच्यावर विश्वास टाकत त्यांना फेरीवाला विक्रेता सेनेचे उपाध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे थापा आता फेरीवाल्यांचा विषय कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Shiv Sena)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community