विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) रविवारी पुण्यात (Pune) होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी उद्घाटने केली. दरम्यान रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती त्यांनी सोमवारी बारामती (Baramati) येथील एका सभेवेळी दिली. ते म्हणाले की, मी थोडक्यात वाचलो अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती.
बारामीत येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितले की, रविवारी मी एका हाॅस्पिटलचे उद्घाटन केले, त्यावेळी तिस-या मजल्यावर पाहणी केली. त्यानंतर डाॅक्टरांनी चौथ्या मजल्यावर लिफ्टने जाऊ असे सांगितले, त्यांचे वय जास्त असल्यामुळे आम्ही लिफ्टमधून गेलो. तेव्हा अचानक लिफ्ट बंद झाली, लाईट गेली आणि चौथ्या मजल्यावरुन धाडकन लिफ्ट खाली कोसळली. थोडक्यात वाचलो नाहीतर आज नक्कीच श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, असे अजित पवार यांनी सांगितले.
( हेही वाचा: लोकायुक्त कायदा का रखडला? )
वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवार नाराज
सोमवारी अजित पवार बारामती दौ-यावर आहेत. त्यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावांमधये विकास कामांचा आढावा घेतला, तर काही कामांचे भूमिपूजन केले, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. सोमवारी बारामतीमधील वाढत्या गुन्हेगारीवरदेखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर पोलिासांनाही खडे बोल सुनावले.
Join Our WhatsApp Community