- सुजित महामुलकर
गेल्या तीस वर्षातील एकहाती सत्ता असलेल्या शरद पवार यांच्याकडून बारामतीवर यापुढे अजित पवार यांचे वर्चस्व राहील, अशी चिन्हे मंगळवारी झालेल्या लोकसभा निवडणूक मतदानावरून दिसून येत आहे. (Baramati LS Constituency)
मागील तीन निवडणुकीपेक्षा कमी मतदान
मागील तीन लोकसभा निवडणुकीपेक्षा (२००९, २०१४, २०१९) या निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील तीनही निवडणुकीत ६० टक्क्याहून अधिक मतदान बारामती मतदार संघात झाले आहे तर मंगळवारी ७ मे ला ५९.५० टक्के मतदान झाले. (Baramati LS Constituency)
पवार विरुद्ध पवार
२००९ मध्ये ६२.८७ टक्के, २०१४ मध्ये ६८.६४ टक्के तर २०१९ च्या निवडणुकीत ६१.५३ टक्के मतदान झाले आहे. या तुलनेत मंगळवारी मंतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसते. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच या मतदार संघात पवार विरुद्ध पवार (शरद विरुद्ध अजित) अशी थेट लढत झाली. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या. तरीही मतदान कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Baramati LS Constituency)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: शिरूरच्या सभेत Ajit Pawar यांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल)
दादांच्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान
बारामती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. या सहापैकी सर्वाधिक मतदान बारामती विधानसभा क्षेत्रात झाले, जिथे अजित पवार आमदार म्हणून निवडून आले. तर सगळ्यात कमी मतदान खडकवासला विधानसभा क्षेत्रात, जिथे भाजपाचे भीमराव तापकीर प्रतिनिधित्व करतात. अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे प्रतिनिधित्व करीत असलेल्या इंदापूर मतदार संघात ६७.१२ टक्के मतदान झाले तर भाजपाचे राहुल कुल यांच्या मतदार संघात ६०.२९ टक्के मतादान झाले. २०१४ मध्ये राहुल यांच्या पत्नी कांचन कुल भाजपाकडून सुप्रिया यांच्या विरुद्ध पराभूत झाल्या. (Baramati LS Constituency)
काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रात कमी मतदान
काँग्रेसचे दोन आमदार प्रतिनिधित्व करीत असलेल्या पुरंदर (संजय जगताप) आणि भोर (संग्राम थोपटे) यांच्या मतदार संघात अनुक्रमे ५३.९६ आणि ६०.११ टक्के मतदान झाले. एकूणच सहा विधानसभा क्षेत्राचा विचार करता अजित पवार यांचा दबदबा असलेल्या मतदार संघात चांगले मतदान झाले असून यावरूनच निवडणूक निकालाचा अंदाज येणे सोपे झाले आहे. याला दुजोरा मिळाला तो शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकला दिलेल्या मुळाखातीवरून, ज्यात त्यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिले. (Baramati LS Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community