मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना (Baramati Lok Sabha Election 2024) पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. अशातच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे बारामती लोकसभेचे (Baramati Lok Sabha Election 2024) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या प्रचार पत्रकांवर राज ठकरेंचा फोटो झळकताना दिसत आहे.
(हेही वाचा –Mahalakshmi Jagadamba Temple: कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा)
बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Election 2024) निवडणुकीकरीता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
(हेही वाचा –CM Eknath Shinde: राज्यात विकासाची गंगा वाहतेय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रचार पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Baramati Lok Sabha Election 2024) साधारण रोजच्या दौऱ्याचं प्रचार पत्रक जाहीर करण्यात येतं. त्यामुळे सुनेत्रा परवारांचा दौरा कोणत्या गावात किती वाजता आहे. याची माहिती देणारं हे प्रचार पत्रक आहे. या प्रचार पत्रकात आता राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. (Baramati Lok Sabha Election 2024)
हे पहा –