बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Election) पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात खासदारकीसाठी थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं. असं म्हणत जानकरांनी सुळेंवर निशाणा साधला आहे. (Baramati Lok Sabha Election)
देशाच एनडीएचं सरकार बनत आहे
महादेव जानकर म्हणाले, “सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय.” असं जानकर यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा आहे. जानकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान महायुतीत यशस्वी मध्यस्थी झाल्याने परभणीची जागा रासपसाठी सोडण्यात आली. जानकर आता परभणीतून लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आले आहेत. (Baramati Lok Sabha Election)
(हेही वाचा –Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं)
महादेव जानकर म्हणाले, “मी मंत्री होतो तेव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेस सरकारने अश्या योजना कधी लागू केल्या?” अस सवाल त्यांनी विचारला. उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे, आदिवासींच्या 22 योजना धनगर समाजाला द्याव्या ही मी मागणी मोदींना करणार असे ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर म्हणता आणि धनगर समाजाला व्हॉईस चेअरमन करता. ओबीसींना घटनात्मक दर्जा देण्याच काम मोदी सरकारने केलं. असे ते म्हणाले. (Baramati Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community