लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha Election) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे विरोधात रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे या लढतीची चर्चा देशभर सुरु झाली होती. परंतु विदेशातही या लढतीचे कुतूहल दिसून आले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनीच माहिती दिली. ही निवडणूक कव्हर करण्यासाठी अमेरिकेहून प्रतिनिधी आल्याचे त्यांनी सांगितले. (Baramati Lok Sabha Election)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी बारामती (Baramati Lok Sabha Election) लढतीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “बारामती मतदारसंघाची हवा संपूर्ण जगभरात आहे. मी जेवढा वेळ सदानंद सुळेबरोबर घालवीत नाही तेवढा वेळ बारामतीकरांबरोबर आनंदात घालवत आहे. देशभरातून पत्रकार बारामतीमध्ये येत (Baramati Lok Sabha Election) आहेत. परंतु न्यूयॉर्कवरून देखील पत्रकार आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे प्रतिनिधी बारामतीमध्ये तळ ठोकून आहे. त्यांच्यासोबत फोटोग्रॉफर्स आहे. म्हणजे शरद पवार हे जिल्हा, राज्य, देश नव्हे तर अमेरिकेपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हनुमान पावला आहे. त्यापेक्षा वेगळे काय हवे?” असं त्या म्हणाल्या. (Baramati Lok Sabha Election)
हे पहा –
Join Our WhatsApp Community