Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद? राजकीय चर्चांना उधाण! काय म्हणाले संजय राऊत?

256
Barsu Refinery

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery) विरोधात शुक्रवारी मोर्चा निघणार आहे. रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला असून या विरोधातील मोर्चाचे बारसूच्या माळरानावर आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, बारसूवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बारसू रिफानयरी मुद्यावर भाष्य करताना स्थानिकांना विश्वासात घ्या असे गुरूवारी म्हणाले होते. मात्र ठाकरे गटाने याविरोधी भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : 100@ Mann Ki Baat : ‘मन की बात’ शंभरावा भाग होणार प्रसारित! केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘या’ अनोख्या उपक्रमांचे आयोजन)

काय म्हणाले संजय राऊत? ( Barsu Refinery) 

संजय राऊतांनी यावर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “शरद पवार यांचं मी म्हणणं मी ऐकलं स्थानिक लोकांना विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा…म्हणजे काय करायचं?” असा उलट सवाल राऊतांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केला. स्थानिकांचा सरकारवर विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीचा आग्रह होता म्हणून पर्याय आम्ही सूचवला. पण ती जागा घेण्यासाठी जबरदस्ती केली नाही. उद्धव ठाकरे सुद्धा तिथे जाणार आहेत. हे प्रकरण चिघळण्याआधी, सर्वेक्षण आणि भूसंपादन राज्य सरकारने मागे घ्यावे असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

बारसू रिफायनरीवरून ( Barsu Refinery) वेगवेगळी भूमिका

संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात बारसू रिफायनरीवरून ( Barsu Refinery) वेगवेगळी भूमिका निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बारसूमध्ये सरकारकडून रिफायनरी विरोधकांवर बळाचा वापर सुरू आहे. त्यांच्यावर जबरदस्ती केली जात आहे. जमिनी हिसकावल्या जात असून भविष्यात त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवले जातील अशी भीती त्यांना आहे त्यामुळे जमिनीचे सर्वेक्षण रद्द करावे अशी मागणी राऊतांनी केली आहे.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.