Barsu Refinery : जैतापूरला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ५०० कोटी घेतले होते; नारायण राणेंचा हल्लाबोल 

प्रत्येक विकासकामाला शिवसेनेने विरोध केला आहे. कोणताही प्रकल्प यांनी अडीच वर्षात कोकणात आणला नाही. कोकणाच्या विकासात योगदान काही नाही, असे मंत्री राणे म्हणाले.

175
नारायण राणेंचा हल्लाबोल 
नारायण राणेंचा हल्लाबोल 

मी विधानसभेत मंत्री असताना तेव्हा जैतापूरचा वीज प्रकल्प चालू करू नये बंद करावा, अशी मागणी केली, त्यावर वृत्तपत्रात बातमी आली ‘कोळशापासून वीज निर्मिती करणारे ३४ उद्योगपती उद्धव ठाकरे यांना भेटले त्यांनी जैतापूरला विरोध करण्यास सांगितले, ५०० कोटींची डील ठरली.’ संजय राऊत म्हणतात कि त्या उद्योगपतींना नारायण राणे घेऊन आले होते, अर्धे अर्धे वाटून घेतले. संजय राऊत यांना माहित नाही मातोश्रीत गेलेल्या पैशाची वाटणी होत नाही, तेव्हा मी मंत्री होतो मी का पैसे घेईन?, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे बारसू येथील गावकऱ्यांना भेटले, त्यावर मंत्री राणे यांनी कडाडून टीका केली. त्यावेळी मंत्री नारायण राणे म्हणाले की, बारसू येथे उध्वस्त ठाकरे पोहचले, तिथे ते सोलगावला गेले, त्यांच्या सभेला परवानगी नाकारली म्हणून मीही माझा दौरा रद्द केला. उद्धव ठाकरे तिथे बडबडले, अनेक धमक्या दिल्या, महाराष्ट्र पेटवीन असे म्हणाले. उद्धव ठाकरे आज ते कोण आहेत याची जाणीव त्यांना आहे का? ४० तर गेले राहिले किती राहिले माहित नाही. शिवसेनेची अवस्था आज राज्यात कमी ताकदीचा पक्ष कोण, तर शिवसेना. चार क्रमांकाचा हा पक्ष आहे. दीर्घकाळ चालता येत नाही, कुणावर हात उगारता येत नाही, मग पेटवायची भाषा करतातच कसे. हेलिकॉप्टरने मशाल घेऊन पेटवणार का? राज्यात इतके नेते आहेत, या प्रकल्पाला विरोध करणारे आहेत किती? प्रत्येक विकासकामाला शिवसेनेने विरोध केला आहे. कोणताही प्रकल्प यांनी अडीच वर्षात कोकणात आणला नाही. कोकणाच्या विकासात योगदान काही नाही. ९०मध्ये मी सिंधुदुर्गात गेलो तेव्हा दरडोई उत्पन्न ३५ हजार होते, आज २ लाख झाले आहे, हे काय शिवसेनेमुळे झाले नाही. याआधी हेच लोक म्हणायचे कोकणाचा कॅलिफोर्निआ करू, तिथे रिफायनरीचे १४ प्रकल्प आहेत, मग इथेच विरोध का?, असे केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.

(हेही वाचा Barsu Refinery :  महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला )

आधीची शिवसेना बाळासाहेबांबरोबर गेली

अवकाळी पाऊस पडला तिथे उद्धव ठाकरेंनी दौरा काढला का? रत्नागिरीत जे मराठी तरुण बेकार आहेत, त्यांची चूल पेटत नाही, त्यांना कधी उद्धव ठाकरे भेटले का? अतिवृष्टीचे २५ कोटी सिंधुदुर्गाला देऊ अशी घोषणा करूनही दिले नाही. अपयशी मुख्यमंत्री होता. महाराष्ट्राला कलंक होते. कोरोनात सगळे वृत्तपत्र तोट्यात होते फक्त सामना नफ्यात होता. पंतप्रधानांवर टीका केली, शरद पवार यांच्यामुळे हा मुख्यमंत्री बनला. बाळासाहेब ठाकरे असते तर कधीच मुख्यमंत्री होऊ दिले नसते. त्या ठिकाणी प्रदूषण झाले तर काही तरी यंत्रणा असते. विनाकारण मला डिवचयाचे काम करू नका, कोकणच्या मुळावर आले तर सोडणार नाही. २ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. हजारो नोकऱ्या तयार होतील, शाळा – महाविद्यालय आणि रुग्णालय उभे होणार आहे तिथे रुग्णालय नाही पेशंट मुंबईत येतात, कधी विचार केला आहे का, कोरोनात पैसा घेतला त्या पैशातून कोकणात रुग्णालय बांधले नाही, कोकणात नारायण राणेंनी रुग्णालय बांधले. तुम्ही पेटवणार असता तर आमचे काम उरले असते का? शिवसेना आधीची बाळासाहेबांबरोबर गेली आहे. तोडपाणी करणारे राहिले आहेत. आजही मी मंत्री आहे, असेही मंत्री राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.