BDD Chawl च्या रहिवाशांची पुनर्विकासामध्ये फसवणूक?

वरळीतील बीडीडी चाळ इथे वास्तव्यास असणाऱ्या आणि पुनर्विकसाअंतर्गत नव्या घराच्या प्रतीक्षेत असणारे रहिवाशी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

157

आशिया खंडातील सर्वात मोठा पुर्नविकासाचा प्रकल्प म्हणून BDD Chawl च्या पुनर्विकासाकडे पाहिले जाते. मात्र या पुनर्विकासामध्ये BDD Chawl च्या रहिवाशांची फसवणूक होत असल्याचे म्हटले जात आहे. यात रहिवाशांना ५०० चौ.फु. घर देणार असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ४८५ चौ.फु. घर दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

मुंबई शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या बीडीडी चाळींची (BDD Chawl) पुनर्विकास प्रक्रिया सुरू झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता रहिवाशांनी आपली फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे आता या प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. मुंबईतील वरळीतील बीडीडी चाळीतील (BDD Chawl) रहिवाशी आक्रमक झाले असून, रहिवाशांना सुरुवातीला पुनर्विकासाअंतर्गत 500 चौरस फूट इतके मोठे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

(हेही वाचा उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची चौकशी करणार; मुख्यमंत्री Pushkar Singh Dhami यांचे निर्देश)

प्रत्यक्षात मात्र घरांची बांधणी करतना 485 स्क्वेअर फुटाची घर बांधण्यात आली. ही वस्तूस्थिती पाहता वरळीतील बीडीडी चाळ इथे वास्तव्यास असणाऱ्या आणि पुनर्विकसाअंतर्गत नव्या घराच्या प्रतीक्षेत असणारे रहिवाशी प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरम्यान सध्या वरळीतील बीडीडी चाळ (BDD Chawl) येथे पोलीस मैदान परिसरात बीडीडी चाळींच्या जागेवरच आठ विंगचे बांधकाम पूर्ण झाले असून, तिथे जवळपास दोन हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर, साने गुरुजी मैदान इथे बांधण्यात येणाऱ्या चार विंगच्या कामालाही आता वेग आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.