“वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!” बंडखोर आमदारांना ‘सामना’तून इशारा

117

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत फुट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेत ४० हून अधिक आमदार आसामच्या गुवाहाटी येथे आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारंना भावनिक साद घातली. तर विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधत कांगावा करत असल्याचा आरोप केला आहे. अशातच दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बंडखोर आमदारांना सतर्क करत वेळीच शहाणे व्हा, सावध व्हा असा सूचक इशारा देण्यात आला आहे.

(हेही वाचा – …जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, “मी आणि माझे कुटुंब शिवसेना सोडायला तयार…”)

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले असताना सामना अग्रलेखातून देण्यात आल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून भावनिक आवाहन

सामानातून बंडखोर आमदारांना कायम माजी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे. यामुळे एककीडे कडक इशारा तर दुसरीकडे भावनिक आवाहन केल्याने हा विरोधाभास देखील पाहायला मिळत आहे.

काय म्हटले आहे सामनात?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सामनाच्या अग्रलेखातून इशारा देण्यात आला आहे. अग्रलेखात असे म्हटले की, राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.