भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास खपवून घेणार नाही!

दिवगंत मनोहर पर्रिकर यांच्या देखरेखीत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे सांगितले. या कारवाईमुळे भारत हा एक सक्षम देश आहे आणि देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही हा संदेश जगभर पोहोचल्याचे अमित शहा म्हणाले.

129

पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवाया पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. हे असेच सुरू राहणार असेल तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो, असा गर्भित इशारा देत भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास खपवून घेणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ते गोव्यातील धरबोंद्रा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

काश्मिरी पंडित आणि शिखांची इथे हत्या

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची तीव्रता वाढली आहे. काश्मिरी पंडित आणि शिखांची इथे हत्या झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला होता. या घटनांनंतर भारताच्या जवानांनी केलेल्या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा : लसीकरणाशिवाय मुले करू शकणार रेल्वे प्रवास! सरकारने स्वतःच्याच नियमाला फासला हरताळ!)

भारत हा एक सक्षम देश

गोव्यातील धरबोंद्रा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय गुन्हे विज्ञान विद्यापीठाची (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कोनशिला ठेवली. यावेळी बोलताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षणमंत्री दिवगंत मनोहर पर्रिकर यांच्या देखरेखीत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे सांगितले. या कारवाईमुळे भारत हा एक सक्षम देश आहे आणि देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही हा संदेश जगभर पोहोचला आहे. चर्चेची वेळ संपली आता ठोस प्रतिक्रियेतूनच उत्तर दिले जाईल, असेही अमित शहा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.