नागरिकांची पाण्यासाठी वणवण; खासदार Bajrang Sonawane मात्र सत्कारात व्यस्त

केज येथील खासदार सोनावणे यांच्या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री अशोक पाटील यांनी थेट खासदार सोनावणे (Bajrang Sonawane) यांना सुनावले. सत्कार समारंभात वेळ घालू नका, असे पाटील म्हणाले.

188
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी केला. तेव्हापासून सोनावणे मतदारसंघात फिरत आहेत पण सत्कार स्वीकारण्यासाठी, स्वतःचे कौतुक करवून घेण्यासाठी, मात्र त्याच वेळी या भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्यासाठी खासदार सोनावणे यांना कधी वेळ मिळणार, अशी विचारणा तेथील जनता विचारत आहे.

नागरिकांचे पाण्यासाठी हाल

बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane)  यांचा केजमध्ये मोठा सत्कार करण्यात आला, त्याच केजमध्ये बजरंग वस्ती आहे. त्याच भागातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून तिथल्या नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, मात्र, त्यांना यश मिळाले नाही. ज्या बोरवेलद्वारे या वस्तीमध्ये पाणी दिले जाते, त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे, त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

खासदार सोनावणे यांना सुनावले 

विशेष म्हणजे स्थानिक नागरिक प्रशासनाकडे वारंवार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती करत होते, परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. लहान मुले पाण्याच्या एक एक हंड्यासाठी धावा धाव करत आहेत. खासदारांच्या गावातच नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. केज येथील खासदार सोनावणे यांच्या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री अशोक पाटील यांनी थेट खासदार सोनावणे (Bajrang Sonawane) यांना सुनावले. सत्कार समारंभात वेळ घालू नका, असे पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.