मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी हे वॉरंट राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आले होते. सांगली येथील शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंवर वॉरंट जारी करुनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल पोलिसांना केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातही अजामीनपात्र वॉरंट समोर आले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंचा ‘वसंता’ म्हणाला, “मी नाराज नाही तर…”)
मराठी पाट्यांसंदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी बीड जिल्ह्यातून हे वॉरंट जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार की नाही, अशा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंविरोधात बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश दिले आहे. जामिनानंतरही सतत न्यायालयामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारीला न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते आणि 13 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले असताना राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर न झाल्याने परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण?
२००८ साली मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीने परळी येथे आंदोलन करण्यात आलं होतं. परळी येथे त्यावेळी जबरदस्ती दुकानं बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता.
Join Our WhatsApp Community