बीडमध्ये एकादशीला भगरीच्या दशम्या खाल्याने ७० जणांना विषबाधा

135

राज्यभरात १० जुलै रोजी आषाढी एकादशी विठ्ठल भक्तांनी उत्साहात साजरी केली. परंतु याच दिवशी एक चिंताजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. बीडमधील एका गावात उपवासासाठी तयार केलेल्या फराळातून अनेकांना विषबाधा झाली आहे. भगरीपासून तयार केलेला पदार्थ खाल्याने एकाच गावातील तब्बल ७० लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे घडली.

काय घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भगरीपासून दशम्या तयार करण्यात आल्या होत्या. या दशम्या खाल्यानंतर अनेक जणांना उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. यानंतर या ७० जणांना तब्बल रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

(हेही वाचा – १६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झालेल्या साखळी बाॅम्ब ब्लास्टने हादरली मुंबईची लाईफलाईन)

एकादशीच्या दिवशी बीडमधील वडवणी तालुक्यात कवडगाव येथे गावकऱ्यांनी एकत्रितपणे भगरीच्या दशम्या केल्या होत्या. या खाल्याने अनेकांना उलटी, चक्कर, जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर कवडगावच्या जिल्हा परिषद शाळेत यापैकी काही जणांवर उपचार सुरू करण्यात आले. तर काही जणांना आरोग्य उपकेंद्र आणि काहींना खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. वेळेवर त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. भगरीच्या दशम्या खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्यानंतर कवडगावमधील नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली होती. यानंतर असेही सांगितले गेले की, अनेक दिवसांची पॅकिंग असलेल्या भगरीत बुरशी तयार होते, आणि ही बुरशी म्हणजे एकप्रकारचे विषच असते. मात्र ही बुरशी या लोकांच्या पोटात गेल्याने फराळातून त्यांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.