राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

97

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटोपून मुंडे परळीकडे जात होते. त्यावेळी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डाॅक्टरांनी त्यांना सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. फेसबूक पोस्टवरुन त्यांनी अपघाताची माहिती दिली आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

( हेही वाचा: सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने हटवला; कारवाईच्या निषेधार्थ बंदची हाक )

मुंडे यांना उपचारासाठी मुंबईला हलवणार

धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात येणार आहे. ब्रीच कॅन्डी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी धनंजय मुंडे दुपारी दोन वाजता लातूरवरुन रवाना होणार आहेत. एअर अॅम्बुलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईत उपचारांसाठी नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.