शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात याबाबत अद्याप शंका उपस्थित केली जात आहे. अशातच बीड येथील शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यापूर्वीही विनायक मेटे यांच्या गाडीचा 3 ऑगस्ट रोजी देखील घातपाताचा प्रयत्न झाला होता. बीडहून पुण्याकडे जात असताना शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता, असा खुलासा बीड येथील पदाधिकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मेटेंच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात झाला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
काय केला धक्कादायक खुलासा
3 ऑगस्ट रोजी बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या जवळपास दोन गाड्यांनी पाठलाग केला. आयशर गाडीने हा पाठलाग केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचे मी मेटेसाहेबांना सांगितले पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असे त्यावेळी मेटेंनी मला सांगितले. त्यामुळे आम्ही शांत राहिलो. पण आता जो अपघात झाला, त्यातही जर आयशर गाडी असेल आणि ती गाडी ३ तारखेला पाठलाग केलेली असेल तर हा घातपातच आहे आणि आम्ही आता शांत बसणार नाही, असे म्हणत शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब मायकर यांनी खुलासा केला आहे.
(हेही वाचा – Pune Metro ची ट्रायल रन यशस्वी; लवकरच गरवारे ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो धावणार)
त्यांनी पुढे असेही सांगितले की, मेटे यांना महत्त्वाची बैठक असल्याने ते म्हणाले जाऊ दे कोणीतरी दारू प्यायलेले असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. पुढे आयशर आणि मागे चार चाकी गाडी असा खेळ तब्बल दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत सुरू होता. चारचाकीमधील लोकं हात करून पुढे कार थांबवा असे सांगत होते. हे मेटे देखील पाहत होते. यावेळी मेटेंनी चालकाला गाडी दमाने घे, जाऊ दे त्यांना जायचं असेल तर असेही सांगितले. पण कोण आहेत हे लोकं जरा बघूया असेही मेटेंना सांगितले होते. पण त्यांना जाऊ दे असे मेटे म्हणाले.
(हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला)
Join Our WhatsApp Community