उत्तर प्रदेशातील धर्मांतराचे बीड कनेक्शन!

इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे. तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये दुभाषिक म्हणून तो काम करतो.

145

उत्तर प्रदेशातील एटीएसने मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी या दोन मौलवींना धर्मांतराच्या प्रकरणात अटक केली. तेव्हा त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. यावेळी एटीएसच्या समोर धर्मांतराचे रॅकेट समोर आले आहे. त्यामध्ये एटीएसने आणखी तीन तरुणांना अटक केली. त्यामधील इरफान शेख हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील या धर्मांतराचे बीड कनेक्शन उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हे धर्मांतराचे जाळे उत्तर प्रदेशसह दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि केरळ राज्यांतही पसरलेले असल्याचे समोर आले आहे.

uttar pradesh

कोण आहे इरफान शेख?

एटीएसने ताब्यात घेतलेला इरफान खान हा मौलाना गौतम याचा पैशाचा व्यवहार हा इरफान सांभाळायचा, अशी सूत्रांची माहिती आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील तो रहिवासी आहे. सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये दुभाषिक म्हणून तो काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये यूपी एटीएसने ताब्यात घेतले आहे. शिरसाळ इथेच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. सध्या तो प्रोफेसर म्हणूनही काम करत आहे. विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील विद्यालयात आयोजित एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी स्वत: पंतप्रधान मोदी यांनी इरफान याचे उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक करत शाब्बासकीची थाप मारली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

(हेही वाचा : ‘तो’ मौलवी निघाला अब्जाधीश! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा!)

काय आहे प्रकरण?

उत्तरप्रदेश येथे एक हजार मूक-बधिर मुले, अबला महिला यांचे धर्मांतर केल्याबाबत उत्तर प्रदेश एटीएसने धक्कादायक खुलासा केला. या प्रकरणामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही व्यक्त केला आला. लवकरच राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे या प्रकरणाची चौकशी सोपवली जाऊ शकते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, यामध्ये सामील असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गुंडा ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मौलवी गौतमकडे अब्जावधीची मालमत्ता!

या धर्मांतराचे मास्टरमाइंड मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी हे मूक-बधिर मुलांच्या शाळांना लक्ष्य करायचे, तसेच गरीब, अबला महिला यांना नोकरी आणि लग्नाची खोटी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करायचे. अशा प्रकारे १ हजार हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले आहे. मौलवी गौतम याच्याकडे अब्जावधीची स्थावर आणि जंगम स्वरूपाची मालमत्ता आहे. एकट्या गाझियाबादमध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. जिल्ह्यातील शाळांना तो पैसे पुरवायचा. त्यामुळे एटीएस आता अशा शाळांची बँक खाती धुंडाळत आहे. फतेहपूर जिल्ह्यातील पंथुआ गावात राहणारा मौलवी महंमद उमर गौतम हा क्षत्रिय कुटुंबातील आहे. उमरचे वडील धनराज सिंह हे नामांकित क्षत्रिय कुटुंबातील असून सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. धनराजच्या 6 मुलांपैकी चौथा मुलगा उमर आहे. उमरचे पूर्वीचे नाव श्याम प्रताप होते. त्याने 12 वी नंतर पंतनगर इथे कृषी अभ्यासक्रम आणि त्यानंतर एमएमयूमधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्याचा विवाह शेजारच्या गावातील राजेश्वरी हिच्याशी झाला होता. उमरने राजेश्वरीचेही धर्मांतर करून तिला रझिया केले आणि स्वतः श्याम प्रताप उर्फ उमर गौतम बनला. धर्मांतर केल्याने त्याला वडिलांनी कुटुंबातून त्याला बाहेर काढले.

(हेही वाचा : धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.