आसाम सरकारने (Government of Assam) बुधवार, ०४ डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) सरकारने गोमांसावर बंदी (Beef ban) घातली आहे. भाजपाचे आसाममधील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, आम्ही निर्णय घेतला आहे की कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये बीफ दिले जाणार नाही आणि ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी दिले जाणार नाही. (Himanta Biswa Sarma)
वास्तविक, आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवार, ०४ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक झाली. यादरम्यान इतर मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी राज्यात गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गोमांस बंदीच्या या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका (Assam Minister Piyush Hazarika) यांनी म्हटले की, मी आसाम काँग्रेसला आव्हान देतो की त्यांनी गोमांस बंदीचे स्वागत करावे नाहीतर पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे. असे खडेबोल हजारिका यांनी केले. (Himanta Biswa Sarma)
(हेही वाचा – Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मुंबईत उद्धव सेनेने शाखाप्रमुखांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी)
दरम्यान, गोहत्येबाबत भारतात कोणताही कायदा नाही. पण वेगवेगळी राज्ये असा कायदा बनवतात. हरियाणात गोहत्याबंदी (Haryana Cow Slaughter Ban) कायद्याचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपये दंड आणि १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे जिथे गायी आणि म्हशीच्या मांसावरही बंदी आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, पुडुचेरी आणि अंदमान निकोबारमध्ये आंशिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हेही पाहा –