फडणवीसांचा मराठवाडा दौरा, पंकजाताई म्हणाल्या ‘मला बोलायचं नाही’… का? वाचा

कोणाचेही कॉल घेणे किंवा वैयक्तिक भेटीगाठी करणे आपल्याला जमणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

126

राज्यातील मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्त जिल्ह्यांची सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांकडून जोरदार पाहणी सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडेही मराठवाड्यातील जिल्ह्यांची पाहणी करत आहेत.

पण फडणवीसांचा दौरा सुरू होणार असतानाच पंकजा मुंडे यांनी विश्रांती घ्यायचे ठरवले आहे. आपली तब्येत बरी नसल्याने पुढील दोन-चार दिवस आपण विश्रांती घेणार असल्याचे पंकजाताईंनी ट्वीट करत सांगितले आहे. आता त्यांची तब्येत बिघडली असली, तरी फडणवीसांच्या दौ-यावेळीच त्यांनी विश्रांती घेण्याचे ठरवल्याने या दोन नेत्यांमध्ये तर काही ‘बिघडलेलं’ नाही ना, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत.

(हेही वाचाः राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत धुसफूस, तरीही मुख्यमंत्री चिडीचूप!)

काय आहे पंकजाताईंटचे ट्वीट?

पंकजा मुंडे गेले काही दिवस मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत आहेत. पण आपल्या घशाला त्रास होत असल्याने पुढचे दोन-चार दिवस आपल्याला सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात कोणाचेही कॉल घेणे किंवा वैयक्तिक भेटीगाठी करणे आपल्याला जमणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

सल्ला आहे की उपाय?

देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौ-यावेळीच पंकजाताईंच्या ट्वीटने दोन्ही नेत्यांत काही नाराजी तर नाही ना, अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे बोलायचे नाही हा डॉक्टरांनी दिलेला सल्ला आहे की, बोलणे टाळायचा सोपा ‘उपाय’ आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?)

फडणवीसांचा दौरा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारपासून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. पुढील तीन ते चार दिवस त्यांचा हा दौरा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही मुंडे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अनेक मुंडे समर्थकांनी आपले राजीनामे दिले होते. पण ते सर्व राजीनामे परत करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.