एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी सोमय्यांनी दिला आकड्यांचा हिशोब!

94

विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या पाचही जागा निवडून आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह निवडणूकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. शिंदे यांनी रातोरात आपला मुक्काम सूरतमध्ये हालवला. दरम्यान, आज ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे, यापूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विट करत आकड्यांचा हिशोब दिला आहे.

काय केले सोमय्यांनी ट्विट

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांचे १२ वाजणार असल्याचे म्हटले आहे. यासह त्यांनी आकड्यांचा हिशेब मांडत शिवसेनेला ( माफिया सेनेला) ५२ मत मिळाली. १२ मत फुटली ( ५५ शिवसेना + ९ समर्थक = ६४ ) असे म्हटले आहे.

(हेही वाचा – नॉट रिचेबल झाल्यानंतर शिदेंची पहिली FB पोस्ट, म्हणाले, “… आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग”)

दरम्यान, भाजपला राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं पडली होती. यंदा विधानसभा निवडणुकीत १३३ मतं पडल्याने महा विकास आघाडी सरकारची आणखी १० मतं फोडण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं आहे. मात्र शिवसेनेची ११ मतं फुटल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ आहे. अशा परिस्थित मतदान करून माघारी निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलवत उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तर संजय राऊत यांनी देखील आपला दिल्लीचा दौरा रद्द केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.